लोकांनी फटकारल्यावर उर्मट विजय नरमला; म्हणाला,'माझा प्रत्येक सिनेमा...'

'माझा सिनेमा पहायचाय असेल तर पहा,नाहीतर नका पाहू..' विजय देवरकोंडाच्या वक्तव्यानंतर बॉयकॉट लाइगर मागणीनं जोर धरला होता.
Vijay Deverakonda now afraid of boycott bollywood trend, now narrating story of his struggle.
Vijay Deverakonda now afraid of boycott bollywood trend, now narrating story of his struggle.Google
Updated on

Vijay Deverakonda: साऊथच्या सुपरहिट 'अर्जुन रेड्डी' सिनेमाचा सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडा आपल्या 'लाइगर'(Liger) सिनेमामुळे भलताच चर्चेत आहे. पुरी जगन्नाथ यांच्या दिग्दर्शना अंतर्गत बनलेल्या लाइगरमध्ये विजय देवरकोंडा सोबत अनन्या पांडे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. २५ ऑगस्टला सिनेमा रिलीज होणार आहे. विजय आणि अनन्या (Ananya panday)संपूर्ण देशात फिरुन सिनेमाचं दणक्यात प्रमोशन करताना दिसत आहेत. यादरम्यानच त्यांचा सिनेमा देखील आता बॉयकॉट ट्रेन्डच्या(Boycott Trend) वादळात फसला आहे. यावर प्रतिक्रिया देताना विजय देवरकोंडा म्हणाला होता की,''या मुद्द्याला अवाजवी महत्त्व दिलं जात आहे''. पण यावरनं अभिनेत्याला लोकांनी फटकारल्यानंतर आता त्याचे सूर बदलले आहेत.विजय देवरकोंडा बॉयकॉट ट्रेंडला घाबरल्याची चर्चा आता रंगली आहे, आता तो म्हणतोय,''मी एक स्ट्रगलर..'',चला सविस्तर जाणून घेऊया नेमकं काय बोलत आहे विजय देवरकोंडा.(Vijay Deverakonda now afraid of boycott bollywood trend, now narrating story of his struggle)

Vijay Deverakonda now afraid of boycott bollywood trend, now narrating story of his struggle.
आर्यननं वर्षभरानं इन्स्टावर पोस्ट केले फोटो; शाहरुख म्हणाला,'आत्ताच्या आता...'

विजय देवरकोंडाने सुरुवातीला आपल्या स्ट्रगलविषयी बातचीत केली. त्याला त्यातून सांगायचं होतं की,त्यानं स्वतः मेहनत घेऊन सिनेमात नाव कमावलं आहे. त्याचा कुणीही गॉडफादर इथे नव्हता, जेव्हा तो इंडस्ट्रीत आला. तो म्हणाला,''इथे यायला मी खूप स्ट्रगल केलं आहे. मला रिस्पेक्टसाठी लढावं लागलं. मला इथे सिद्ध करण्यासाठी झगडावं लागलं. कामासाठी लढावं लागलं. माझा प्रत्येक सिनेमा एक लढाई होती. जो माझा पहिला सिनेमा होता त्याला कुणी निर्माताच मिळत नव्हता. आम्ही सगळ्यांनी फुकटमध्ये सिनेमात अभिनय केला,का तर तो सिनेमा पूर्ण करायचा होता. तो रिलीज झाल्यानंतर मग लोकांनी तो डोक्यावर उचलून धरला, आम्हाला प्रेम दिलं,सिनेमा हिट झाला. आम्ही तेव्हा काहीच नव्हतो. एकदम झिरोपासून सुरुवात मी केली आहे''.

त्यानंतर विजय म्हणाला, ''त्याचा तिसरा सिनेमा 'अर्जुन रेड्डी'च्या वेळेस देखील खुप गोंधळ माजला होता. कितीतरी लोकांनी त्याच्या सिनेमावर आक्षेप घेतला होता. कितीतरी पक्षांनी आणि संघटनांनी रस्त्यावर उतरुन 'अर्जुन रेड्डी' सिनेमाविरोधात आवाज उठवला होता. पण नंतर सिनेमा रिलीज झाला,लोकांना आवडला आणि मग हिट झाला आणि आज त्या सिनेमामुळे लोक मला ओळखू लागले''.

Vijay Deverakonda now afraid of boycott bollywood trend, now narrating story of his struggle.
पंकजा मुंडेंनी राजकारण सोडलं? कलाक्षेत्रातल्या धमाकेदार एन्ट्रीची चर्चा

पुढे विजय म्हणाला, ''माझे आणखी दोन सिनेमे रिलीजआधीच लीक झाले. लोकांना कुणाचं चांगलं होत असेल तर ते बघवत नाही. त्यावेळी सोशल मीडियावर पसरवलं गेलं की विजयचे सिनेमे बोअर आहेत,फ्लॉप आहेत.याचं करिअल संपलं. पण जेव्हा ते रिलीज झाले तेव्हा पुन्हा लोकांचे प्रेम मिळाले आणि सिनेमे हिट झाले''.

Vijay Deverakonda now afraid of boycott bollywood trend, now narrating story of his struggle.
अनुपम खेर यांचा पुन्हा आमिरवर घणाघात, म्हणाले,'आता मान्य कर...'

याआधी एका मुलाखतीत विजय आणि अनन्या यांना बॉयकॉट ट्रेन्डविषयी विचारले गेले होते तेव्हा त्यानं अगदी बिनधास्त वक्तव्य करत म्हटलं होतं की,''मला वाटतं आपण या बॉयकॉट ट्रेन्डला उगाचच इतकं महत्त्व देत आहोत''. त्यावर अनन्या देखील म्हणाली होती,''दर दिवशी बॉयकॉट ट्रेन्ड सुरू आहेत''. त्यावर लगेच तिची री ओढत विजय म्हणाला होता, ''हो,मग करु दे बॉयकॉट.आपण काय करू शकतो. आपण सिनेमे बनवतो,ज्यांना पहायचं ते पाहतील.आणि ज्यांना पहायचे नाहीत ते नंतर टीव्ही किंवा फोनवर पाहतील ते सिनेमे. आपण याला काहीच करू शकत नाही''.

'लाइगर' सिनेमा बॉयकॉट करणं सुरू आहे याची तीन कारणं समोर आली आहेत. पहिलं कारण हे की करण जोहरनं हा सिनेमा प्रोड्युस केला आहे. कारण याआधीच करणचं नाव नेपोटिझमला खतपाणी घालतो म्हणून खराब झालंय, त्यात सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतरही त्याच्यावर लोकांचा राग निघाला होता. त्यामुळे त्याच्या प्रत्येक सिनेमाला बॉयकॉट करण्याची मागणी होताना दिसत आहे.

दुसरं कारण अनन्या पांडे, जी नेपोकीड्स म्हणून ओळखलं जातं आणि तिच्या स्ट्रगल स्टोरीची आधीच खिल्ली उडवली गेली आहे. तिसरं कारण विजयचं वक्तव्य. विजयचे भले मोठी फॅनफॉलॉइंग आहे,पण गेल्या काही दिवसांत त्यानं जे बॉयकॉट ट्रेन्डविषयी वक्तव्य केली आहेत,ती देखील उर्मटपणे त्यामुळे ट्रोलर्सनी त्याच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. आता या सिनेमाची बॉक्सऑफिसवर काय अवस्था होते, हे २५ ऑगस्ट रोजी कळेलच.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()