Boycott Liger Trend: बॉलीवूडचे सुपरस्टार्स आमिर खान(Aamir Khan),अक्षय कुमारनंतर आता साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडादेखील(Vijay deverakonda) ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. बॉयकॉट लाल सिंग चड्ढा(Laal Singh Chaddha)आणि बॉयकॉट 'रक्षाबंधन' नंतर आता सोशल मीडियावर विजय देवरकोंडाच्या आगामी 'लाइगर' सिनेमाला बॉयकॉट करण्याची मागणी जोर धरताना दिसत आहे. ट्वीटरवर #BoycottLigerMovie ट्रेंड होताना दिसत आहे.(Vijay Deverakonda trolled boycott liger movie trend on twitter after he support aamir khan laal singh chaddha)
साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडाने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत बोलताना बॉयकॉट ट्रेंडवर स्पष्ट मत मांडलं आहे. विजयने आमिर खानला पाठिंबा देताना लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला आहे की लाल सिंग चड्ढा सिनेमाला बॉयकॉट केलं तर याचा आमिर खानवर फार परिणाम होणार नाही,तर या सिनेमाशी जोडलेल्या इतर लोकांच्या रोजगारावर मात्र याचा वाईट परिणाम होईल.
विजय म्हणाला की,''मला वाटतं की सिनेमाच्या सेटवर कलाकार,दिग्दर्शक यांच्याव्यतिरिक्त इतरही अनेक महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे लोक असतात. एका सिनेमासाठी २०० ते ३०० कलाकार काम करतात. आणि आमच्या सगळ्या लोकांचे स्टाफ मेंबर्सदेखील असतात. त्यामुळे एक सिनेमा अनेक लोकांना रोजगार देत असतो. कितीतरी लोकांचं आयुष्य यावर अवलंबून असतं.''
विजय देवरकोंडा पुढे म्हणाला की,''आमिर खानने जेव्हा 'लाल सिंग चड्ढा' बनवला तेव्हा तो सिनेमा त्याचा सिनेमा म्हणून समोर आला पण याच्याशी खरंतर २ ते ३ हजार लोक जोडलेले आहेत. जेव्हा तुम्ही कोणत्या सिनेमाला बॉयकॉट करता तेव्हा त्याचा परिणाम फक्त आमिर खानवर होत नाही तर सिनेमाशी जोडलेल्या हजारो लोकांच्या रोजगारावर होत असतो''.
विजय देवरकोंडा पुढे म्हणाला की','आमिर खान एक असे स्टार आहेत जे लोकांना थिएटर्सपर्यंत खेचून आणतात. मला नाही माहित त्यांच्या सिनेमाला बॉयकॉट का केलं जात आहे. पण ज्या कोणत्या चुकीच्या समजुतीतून हे घडत आहे, तर तुम्ही लक्षात घ्या की हे फक्त आमिर खानला इफेक्ट करणार नाही तर पूर्ण अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होईल''.
विजय देवरकोंडाचं लाल सिंग चड्ढाविषयीचं समर्थन लोकांना मात्र खटकलं आहे. सोशल मीडियावर लोक विजय देवरकोंडाला रागानं सुनावताना दिसत आहेत. लोक आता त्याच्या 'लाइगर' सिनेमाला बॉयकॉट करण्याच्या मागे हात धुवून लागले आहेत. ट्वीटरवर तर बॉयकॉट लाइगर ट्रेंड होताना दिसत आहे.
एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'ही गोष्ट विसरुन चालणार नाही की या सिनेमाची निर्मिती करण जोहरची आहे. ज्याला स्वतःला हिंदी संस्कृतीविषयी सम्मान नाही. विजय जे बोलतोय त्याला नीट समजून घेतलं तर त्याला कोणत्याच गोष्टीचं काहीच सोयरंसूतक नाही असं दिसतंय. त्यामुळे यावेळी देखील आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन या आगामी 'लाइगर' सिनेमाला देखील बॉयकॉट करावं लागेल. #boycottligermovie'.
विजय देवरकोंडाचा 'लाइगर' सिनेमा २५ ऑगस्ट रोजी रिलीज होत आहे. सिनेमात अनन्या पांडे महत्त्वाच्या भूमिकेत आहे. सिनेमाविषयी लोकांमध्ये उत्सुकता आहे. पण आता बॉयकॉटचा सुरु झालेला ट्रेंड सिनेमाच्या बॉक्सऑफिस कलेक्शनवर काय इफेक्ट करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.