Vijay Deverakonda: कुशी सुपरहिट झाल्याने विजय सहकुटुंब यदाद्री मंदिरात दर्शनाला, अभिनेत्याला पाहायला फॅन्सची धक्काबुक्की
विजय देवराकोंडा आणि समंथा रुथ प्रभूचा कुशी सिनेमा सर्वांना आवडत आहे. समंथा आणि विजयची जोडी प्रेक्षकांना आवडत आहे.
समंथा आणि विजय या दोघांची केमिस्ट्री आणि जोडी सर्वांना आवडतेय. कुशी निमित्ताने विजयच्या सिनेमाने पुन्हा एकदा यशाची गोडी चाखलीय. त्यानिमित्ताने विजय सहकुटुंब तेलंगणा मधील श्री लक्ष्मीनारायण यदाद्री मंदिरात दर्शनासाठी पोहोचला. तिथे विजयची एक झलक बघायला फॅन्सची प्रचंड गर्दी लोटली.
(Vijay Deverakonda visits telangana Yadadri Temple with family after Kushi release samantha)
विजय यदाद्री मंदिरात नतमस्तक
साऊथ स्टार विजय देवरकोंडाचा नुकताच प्रदर्शित झालेला 'कुशी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाला सर्व बाजूंनी सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पाच वर्षांनंतर हिट चित्रपट दिल्याबद्दल विजयने सोशल मिडीयावर चाहत्यांचे आभार मानले,
याशिवाय विजय तेलंगणातील प्रसिद्ध यदाद्री मंदिरात दर्शनासाठी पोहोचला. विजयने आपल्या कुटुंबासह रविवारी सकाळी यदाद्री मंदिरात नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले. विजय देवराकोंडा मंदिर परिसरात असल्याची माहिती मिळताच त्याला बघण्यासाठी तिथे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली.
विजयला पाहण्यासाठी फॅन्सची झुंबड
विजय आपल्या कुटुंबीयांसह मंदिरात प्रार्थना करुन नतमस्तक होताना दिसला. मंदिर परिसरात विजयला पाहण्यासाठी इतकी गर्दी झाली की मंदिर परिसराच्या यंत्रणेचे गर्दी हाताळण्यात नाकीनऊ आले असतील
विजय मंदिरात घेत असलेल्या दर्शनाचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेता आवारात उपस्थित असलेल्या त्याच्या फॅन्सच्या वेढ्यात दिसतोय.
विजय - समंथाच्या फ्लॉप करिअरला कुशीने वाचवलं
बॉक्स ऑफिस रिपोर्टरनुसार, पहिल्या दिवशी 15.25 कोटीची कमाई करणाऱ्या कुशीने दुसऱ्या दिवशी 10 कोटींचा गल्ला जमवला आहे. या आकडेवारीसोबत आता कुशीचे एकूण कलेक्शन 25.25 कोटींवर गेले आहे.
या आकडेवारीत अशीच वाढ होत राहिली तर हा विजयचा तब्बल पाच वर्षानंतरचा हिट सिनेमा ठरेल तर सामंथाचा यशोदा आणि शकुंतलम फ्लॉप झाल्यानंतर हा चित्रपट तिच्या करियरसाठी चांगली कमागिरी करणारा ठरेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.