Vijay Setupathi : 'काही वेळेला राजकारण होतचं, माझा 'सुपर डिलक्स' ऑस्करला जायला हवा होता'!

साऊथच्या विजयनं आता बिनधास्तपणे मुलाखतीतून त्याच्या यापूर्वीच्या चित्रपटांविषयी भाष्य करण्यास सुरुवात केली आहे.
Vijay Sethupathi Opens Up About ‘Super Deluxe’
Vijay Sethupathi Opens Up About ‘Super Deluxe’ esakal
Updated on

Vijay Sethupathi Opens Up About ‘Super Deluxe’ : साऊथच्या विजयनं आता बिनधास्तपणे मुलाखतीतून त्याच्या यापूर्वीच्या चित्रपटांविषयी भाष्य करण्यास सुरुवात केली आहे. येत्या काही दिवसांत त्याचा अन् कतरिनाचा मेरी ख्रिसमस नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे.

विजय सेतुपतिला काही वर्षांपूर्वी त्याच्याच सुपर डिलक्स नावाच्या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारानं गौरविण्यात आले होते. त्यात त्यानं एका पारलिंगी नावाच्या व्यक्तीची व्यक्तिरेखा साकारली होती. त्या चित्रपटाला केवळ भारतीयच नाही तर जगभरातील प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. देशभरातील आणि विदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये या चित्रपटाचे स्क्रिनिंग झाले होते. त्याला समीक्षकांनी गौरविले होते.

मेरी ख्रिसमसच्या निमित्तानं विजय सध्या वेगवेगळ्या मुलाखतींमधून त्याच्या यापूर्वीचे चित्रपट आणि त्यात झालेले राजकारण याबद्दल बोलताना दिसतो आहे.त्यानं सुपर डिलक्सच्या निमित्तानं जे झालं ते स्पष्टपणे सांगितले आहे. त्याचे म्हणणे आहे की, माझा हा चित्रपट ऑस्करला जाण्याच्या पात्रतेचा होता. मात्र तसे झाले नाही. त्या वर्षी तो मान दुसऱ्याच चित्रपटाला मिळाला होता.

सुपर डिलक्सच्या बाबतीत जे काही झाले ते विजयला आवडले नाही. त्यामुळे तो काहीसा नाराज झाला. त्या मुलाखतीमध्ये तो म्हणतो, त्यावेळई मला असे जाणवले की, काहीवेळेला राजकारण होतेच, पण त्या सगळ्या प्रक्रियेत आपण काहीही करु शकत नाही. अशावेळी आपण जे होते ते पाहत राहतो. राजकारण त्याचे काम करते. विजयनं बिनधास्तपणे त्याची प्रतिक्रिया दिली असून त्याची चर्चा होत आहे.

विजय आणि कतरिनाचा मेरी ख्रिसमसचा १२ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याचे दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केले असून त्यांच्या यापूर्वीच्या अंधाधून आणि बदलापूर या चित्रपटांना प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.