'लता मंगेशकर पाया कधीच पडू द्यायच्या नाहीत'; आशा भोसलेंना आली दीदींची आठवण

दीनानाथ मंगेशकर सभागृहात लता मंगेशकर यांच्या फोटोच्या अनावरणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला.
Vikram Gokhale unveils photo of Lata Mangeshkar at Deenanath Mangeshkar Auditorium
Vikram Gokhale unveils photo of Lata Mangeshkar at Deenanath Mangeshkar AuditoriumGoogle
Updated on

6 फेब्रुवारी,२०२२ ला गान सम्राज्ञी लता मंगेशकर(Lata Mangeshkar) पंचतत्वात विलीन झाल्या. आता त्यांच्या मागे राहिलेल्या आठवणी,त्यांची अमूल्य गाणी या केवळ त्यांच्या परिवारासाठीच नाही तर जगभरातील त्यांच्या चाहत्यांसाठी अलौकीक ठेवा म्हणावा लागेल. दीनानाथ मंगेशकर सभागृहात लता मंगेशकर यांच्या फोटोच्या अनावरणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी लता मंगेशकर यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. यावेळी लता मंगेशकर यांच्या धाकट्या बहिण आशा भोसले आपले अश्रू थांबवू शकल्या नाहीत. भावंडांमध्ये सगळ्यात मोठी बहिण आणि आई-बाबांची सगळ्यात लाडकी मुलगी असलेल्या लता मंगेशकर यांचा एक सुंदर फोटो दिनानाथ मंगेशकर सभागृहाच्या भिंतीवर नजरेस पडेल,ज्या सभागृहात त्यांनी अनेक वेळा आपल्या मधुर सुरांनी लोकांना मंत्रमुग्ध केलं आहे.

Hridaynath Mangeshkar,Asha Bhosle,VIkram Gokhle
Hridaynath Mangeshkar,Asha Bhosle,VIkram GokhleGoogle

लता मंगशेकर यांच्या या फोटोचं अनावरण ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले(Vikram Gokhle) यांच्या हस्ते करण्यात आलं. लता मंगेशकर आणि विक्रम गोखले यांच्या कुटुंबातलं नातं जवळ-जवळ ७० वर्ष जुनं आहे. विक्रम गोखले या फोटो अनावरणाच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले की,''माझे वडील मास्टर दिनानाथ मंगेशकरांचे शिष्य होते. त्यांनी संगीताचं शिक्षण त्यांच्याकडून घेतलं आहे. आम्ही तेव्हा दीनानाथ मंगेशकरांना 'दिना आबा' म्हणून हाक मारायचो. लता मंगेशकर आपल्यात नाहीत हे सत्य पचवणं अजून कठीण जात आहे''.

Vikram Gokhale unveils photo of Lata Mangeshkar at Deenanath Mangeshkar Auditorium
RRR सिनेमाच्या शूटिंगचे 'ते' 65 दिवस Jr NTR साठी कठोर शिक्षेसारखेच...

या अनावरणाच्या कार्यक्रमात आशा भोसले खूप भावूक झालेल्या दिसल्या. लता मंगेशकर यांच्याविषयी बोलताना त्यांच्या डोळ्यातनं अश्रू सतत वाहत होते. त्या म्हणाल्या,''मी जेव्हा कधी कुठे प्रवासाला,कार्यक्रमाला जायचे तेव्हा मी नेहमी दीदीचे आशीर्वाद घेऊन निघायचे. दीदी नेहमी म्हणायची,माझे पाय पडू नकोस,माझा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत असणार आहे.मी,माई,बाबा कायम तुझ्यासोबत राहू. आता दीदीच्या जाण्यानंतर मी कुणाचा आशीर्वाद घेऊ''. आम्हाला खुप लहानपणापासून दीदीनंच आई-वडिलांचं प्रेम दिलं हे सांगताना आशा ताईंना भावना अनावर झालेल्या सगळ्यांनीच पाहिल्या. या फोटो अनावरणाच्या प्रसंगी विक्रम गोखले,आशा भोसले,हृदयनाथ मंगेशकर,उषा मंगेशकर,भारती मंगेशकर,रुपकुमार राठौड,सोनाली राठौड,आदिनाथ मंगेशकर असे अनेक मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.