Vikram Gokhale: भिकार मालिका पाहणं बंद करा.. असं का म्हणाले होते विक्रम गोखले?

अभिनेते विक्रम गोखले यांनी मराठी मालिकांवर ताशेरे ओढले होते.
vikram gokhle criticize on television industry marathi serial and  entertainment media news
vikram gokhle criticize on television industry marathi serial and entertainment media newssakal
Updated on

Vikram Gokhale death Anniversary: मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचाआज स्मृतीदिन निधन. विक्रम गोखले जितके त्यांच्या अभिनयामुळे चर्चेत होते, तितकीच चर्चा गेली काही दिवस त्यांच्या वादग्रस्त विधानांची होती होती. असेच विधान त्यांनी मराठी मालिकांबाबत केले होते.

vikram gokhle criticize on television industry marathi serial and  entertainment media news
Vikram Gokhale: 'माहेरची साडी' चित्रपटाच्या सेटवर विक्रम काका.. अलका ताईंनी सांगितली खास आठवण

'अशा भिकार मालिका पाहणं बंद करा..' असे थेट आवाहन गोखले यांनी प्रेक्षकांना केले होते. मनोरंजन क्षेत्राचा दर्जा घसरला आहे,असे त्यांना सातत्याने वाटत होते. ते का? याबद्दल ते एका व्याख्यानात बोलले होते.

vikram gokhle criticize on television industry marathi serial and  entertainment media news
Vikram Gokhale Demise: ''ते सेटवर आले की...'', विक्रम गोखले यांच्या शेवटच्या मालिकेच्या आठवणी

ते म्हणाले होते, ''प्रेक्षकांनी स्वतःचा चॉईस तपासून पहा! निश्चित करा! त्याच्यावर बंधने घाला....आणि भिकार सीरियल पाहणं बंद करा. तुमचा वेळ वाया घालवू नका! तुम्ही पाहत नाही म्हटल्यावर ते तयार करणार नाहीत आणि चांगल्याच्या मागे लागतील. म्हणजे मग चांगले दिग्दर्शक,नट,लेखक येतील. म्हणूनच अंतर्मुख करणारा सिनेमा,नाटक,सीरियल नक्की पहा.'

'आज मालिका काढताना त्या इतक्या लांबवल्या जातात की त्याला काहीच अर्थ नसतो. मग काय 'घाल पाणी,घाल पीठ' या न्यायाने त्या प्रेक्षकांच्या माथी मारल्या जातात,' असंही ते म्हणाले होते.

यावेळी त्यांनी प्रसार माध्यमा बाबतही गंभीर भाष्य केले होते. 'डीजीटायझेशनमुळे संवेदना, संवेदनशीलता या दोन गोष्टीतील अंतर वाढू लागले असून पैसे मिळविण्यासाठी काहीही प्रेक्षकाच्या माथी मारले जात आहे, असंही ते म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.