'भिकार मालिका पाहणं बंद करा'..विक्रम गोखले पुन्हा गरजले

कल्याणमध्ये सुभेदार वाडा कट्टा आयोजित प्राध्यापक रामभाऊ कापसे व्याख्यानमालेत ते बोलत होते.
Vikram Gokhle
Vikram GokhleGoogle
Updated on

विक्रम गोखले(Vikram Gokhle) यांनी आपल्या आजवरच्या अभिनय कारकिर्दित नाटक,मालिका,सिनेमा अशा सगळ्याच माध्यमातून काम केलं आहे. मराठी नाही तर हिंदीतही त्यांच्या अभिनयाचे चाहते आहेतच. इतकंच काय तर अलिकडेच ते मालिकेतूनही आपल्याला दिसले होते. ते लवकरच बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेतही आपल्याला दिसणार आहेत. म्हणजे मनोरंजन क्षेत्रात वयाच्या पंच्याहत्तरीतही कार्यरत असणाऱ्या विक्रम गोखले यांना अचानक मनोरंजन क्षेत्राचा दर्जा घसरला आहे असं का वाटू लागलं आहे बरं. त्यांनी प्रसारमाध्यमांवर आपला रोख धरलेला आहे. प्रसारमाध्यमं पैशांच्या मागे धावत असल्याने चांगल्याचा त्यांना विसर पडला आहे असं गोखले यांनी म्हटलंय. आज मालिका काढताना त्या इतक्या लांबवल्या जातात की त्याला काहीच अर्थ नसतो. मग काय 'घाल पाणी,घाल पीठ' या न्यायाने त्या प्रेक्षकांच्या माथी मारल्या जातात असंही म्हटलं आहे.

Vikram Gokhle
Big boss: ट्रॉफी जिंकली नाही पण तरीही नशीब फळफळलं...कोणाचं?

विक्रम गोखले काही दिवसांपूर्वीच कंगना रनौतच्या स्वातंत्र्यावरून केलेल्या वादग्रस्त वक्त्व्याला समर्थन केल्यामुळे चर्चेत आले होते. त्यांच्या विरोधात अनेकांनी आवाज उठवला होता. पण त्यानंतर पुन्हा आज विक्रम गोखले गरजले अन् टि.व्ही मालिकांबाबत प्रेक्षकांना चांगल्याच शब्दात त्यांनी सुनावलं. ते म्हणाले की,''प्रेक्षकांनी भिकार मालिका पाहणं बंद करावं''. प्रेक्षकांशी ऑनलाईन संवाद सधाताना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी हे विधान केलं आहे. कल्याण येथे रामभाऊ कापसे व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी विक्रम गोखले यांनी प्रसारमाध्यमांच्या बदललेल्या स्वरुपाबाबत चिंताही व्यक्त केली. त्यांनी इथं बोलताना लोकांच्या चॉईसलाही टार्गेट केलं आहे. प्रेक्षकांनाही त्यांनी तिखट शब्दात खडे बोल सुनावले आहेत. पण तेव्हाच त्यांनी नागराज मंजुळेचं खूप कौतूकही केलं. तसंच नागराजसोबत काम करायला आवडेल असं देखील म्हटलं आहे.

Vikram Gokhle
'बिग बॉस 16' लवकरच भेटीला; या तारखेला होणार सुरुवात?

प्रेक्षकांनी स्वतःचा चॉईस तपासून पहा! निश्चित करा!त्याच्यावर बंधने घाला....आणि भिकार सीरियल पाहणं बंद करा. तुमचा वेळ वाया घालवू नका! तुम्ही पाहत नाही म्हटल्यावर ते तयार करणार नाहीत आणि चांगल्याच्या मागे लागतील. म्हणजे मग चांगले दिग्दर्शक,नट,लेखक येतील. म्हणूनच अंतर्मुख करणारा सिनेमा,नाटक,सीरियल नक्की पहा. राज्यभरातील प्रेक्षकांना प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांनी कल्याणमध्ये सुभेदार वाडा कट्टा आयोजित प्राध्यापक रामभाऊ कापसे व्याख्यानमालेत बोलताना भिकार सीरीयल न पाहण्याचं आव्हान केलंय. यावेळी बोलताना त्यांनी सुरुवातीपासूनच प्रसार माध्यमाच्या बदलत्या स्वरूपाबाबत चिंता व्यक्त केली. डीजीटायझेशनमुळे संवेदना, संवेदनशीलता या दोन गोष्टीतील अंतर वाढू लागले असून पैसे मिळविण्यासाठी काहीही प्रेक्षकाच्या माथी मारले जात आहे, असंही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.