Vikrant Massey: "हिंदू समाजाचा अनादर करण्याचा हेतू नव्हता"; 12वी फेल फेम विक्रांतनं मागितली माफी, नेमकं प्रकरण काय?

Vikrant Massey: विक्रांतनं नुकतेच एक ट्विट शेअर करुन चाहत्यांची माफी मागली आहे. विक्रांतनं चाहत्यांची माफी का मागितली? जाणून घेऊयात...
Vikrant Massey
Vikrant Masseyesakal
Updated on

Vikrant Massey: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 12 वीं फेल (12th Fail) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील विक्रांतच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. पण आता विक्रांत हा त्याच्या चित्रपटामुळे नाही तर त्याच्या एका ट्विटमुळे चर्चेत आहे. विक्रांतनं नुकतेच एक ट्विट शेअर करुन चाहत्यांची माफी मागली आहे. विक्रांतनं चाहत्यांची माफी का मागितली? जाणून घेऊयात...

2018 मधील विक्रांतनं केलं होतं ट्विट

विक्रांतने 2018 मध्ये, सीता आणि भगवान राम यांचे एका वृत्तपत्रात आलेले व्यंगचित्र शेअर केले होते. यामध्ये दिसली की, भगवान राम यांना सीता म्हणते, "मला खूप आनंद झाला आहे की माझे अपहरण रावणाने केले होते, ना की तुमच्या भक्तांनी!" या फोटोला विक्रांतनं कॅप्शन दिले होते, “Half baked potatoes and half-baked nationalists will only cause pain in the gut". Kathua Case, Unnao, Shamem हे हॅशटॅग्स देखील विक्रांतनं या ट्विटला दिले. विक्रांतनं हे ट्विट नंतर डिलिट केलं.

विक्रांतनं मागितली माफी

2018 मध्ये शेअर केलेल्या ट्विटबाबत विक्रांतनं आता स्पष्टीकरण दिलं आहे. विक्रांतनं एक ट्विट शेअर करुन चाहत्यांची माफी मागितली आहे. या ट्विटमध्ये त्यानं लिहिलं, "2018 मध्ये माझ्या एका ट्विटच्या संदर्भात मी काही गोष्टी सांगू इच्छितो, हिंदू समाजाला दुखावण्याचा, बदनाम करण्याचा किंवा त्यांचा अनादर करण्याचा माझा हेतू कधीच नव्हता."

पुढे विक्रांतनं ट्विटमध्ये लिहिलं, "पण मी थट्टेने केलेल्या ट्विटबद्दल विचार केला. वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेले व्यंगचित्र न शेअर करता देखील मी माझे मत मी मांडू शकलो असतो. ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यांची मी अत्यंत नम्रतेने माफी मागू इच्छितो. तुम्हा सर्वांना माहीतच आहे की, मी श्रद्धा आणि धर्माला सर्वोच्च मानतो. आपण सर्वजण काळानुसार पुढे जातो आणि आपल्या चुकांचा विचार करतो, हे माझे होते." विक्रांतच्या या ट्विटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Vikrant Massey
Vikrant Massey : 'मित्र घरी आले जेवण केलं अन् आयुष्यातला सगळ्यात मोठा धडा शिकवून गेले'! विक्रांतचा डोळ्यात पाणी आणणारा अनुभव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.