Pathaan: ‘पठाण’चे शो बंद पाडण्यासाठी बजरंग दलाचा राडा! भाईंदरमध्ये सिनेमागृहात तोफफोड..

भाईंदर मध्ये 'पठाण' चित्रपटाचा शो रद्द करण्यासाठी बजरंग दलचा हिंसक पवित्रा..
violent attempt in bhayandar cinema theatre by bajrang dal for shut down stopping pathan film show
violent attempt in bhayandar cinema theatre by bajrang dal for shut down stopping pathan film showsakal
Updated on

Pathaan :  शाहरुख खानचा 'पठाण' सिनेमा बॉक्स ऑफिस वर चांगलाच जलवा दाखवत आहे. पहिल्याच दिवशी पठाणने रेकॉर्ड ब्रेक कमाई करत 100 कोटींचा आकडा पार केला. आता चार दिवसात जवळपास या चित्रपट 400 कोटींचा टप्पा पार केला आहे.

पठाण म्हंटलं की आठवतो तो, राडा.. आंदोलन आणि विरोध. कारण 'पठाण' चित्रपटाला हिंदुत्व वादी संघटनां कडून सुरुवाती पासूनच विरोध झालेला पाहायला मिळाला आहे. या चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यावरून भगव्या बिकिनीचा तापलेला वाद सर्वांना ठाउकच आहे.

या वादानंतरही पठाण आला आणि बॉक्स ऑफिस वर हीट ही झाला. असे असले तरी अद्याप या चित्रपटाला होणारा विरोध काही मावळायला तयार नाहीय. हा चित्रपट बंद पाडण्यासाठी नुकताच भाईंदरमध्ये मोठा राडा झाला.

(violent attempt in bhayandar cinema theatre by bajrang dal for shut down stopping pathan film show)

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

भाईंदर मध्ये पठाण चित्रपट बंद पाडण्यासाठी बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी सिनेमागृहात तुफान राडा घातला आहे. या प्रकरणात भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हाची नोंद देखील करण्यात आली आहे.

'पठाण'चं शो बंद पाडण्यासाठी हिंसक आंदोलन केल्याने नऊ आरोपींना भाईंदर पोलीसांनी अटक केली आहे.

violent attempt in bhayandar cinema theatre by bajrang dal for shut down stopping pathan film show
Sonu Sood: सोनू सूद भारावला! सोलापूरच्या चाहत्यानं काढली 87 हजार स्क्वेअर फुटाची रांगोळी..

रविवारी संध्याकाळी ४ च्या सुमारास भाईंदर पश्चिम येथील मॅक्सेस मॉलमध्ये सुरू असलेला चित्रपटाचा शो बंद करण्यासाठी बजरंग दलच्या कार्यकर्त्यांकडून मोर्चा काढण्यात आला होता.

या प्रसंगी कार्यकर्त्यांनी चित्रपट गृहाबाहेर लावलेले ‘पठाण’ चित्रपटाचे पोस्टर फाडून तिकीट खिडकीची देखील तोडफोड करण्यात आली. या घटनेची माहिती जवळील पोलीस ठाण्याला मिळताच त्यांनी त्या ठिकाणी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

या संदर्भात दंगल करणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे अशा विविध कलमा अंतर्गत भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून नऊ आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुगुटलाल पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.