#83_Movie 'असा क्षण पुन्हा जगता येणार नाही'

83 The Movie
83 The Movieesakal
Updated on
Summary

भारतानं फायनलमध्ये वेस्ट इंडिजचा पराभव करून पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला होता.

रणवीर सिंहचा (Ranveer Singh) स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट '83' (83 The Movie) थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटात रणवीर कपिल देव (Kapil Dev) यांची, तर दीपिका पदुकोण त्यांच्या पत्नी रोमी देवची भूमिका साकारत आहे. 1983 मध्ये भारतीय क्रिकेट संघानं विश्वचषक जिंकल्याची कथा या चित्रपटात दाखवण्यात आलीय.

जेव्हा भारतानं फायनलमध्ये वेस्ट इंडिजचा (West Indies) पराभव करून पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता, तेव्हाचा थरारक अनुभव या चित्रपटात दाखवण्यात आलाय. '83' हा चित्रपट पाहिल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) कसोटी कर्णधार विराट कोहलीनं (Virat Kohli) यावरती आपली प्रतिक्रिया दिलीय. सध्या विराट भारतीय क्रिकेट संघासोबत दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यावर आहे, तिथं टीम इंडियाला रविवारपासून सेंच्युरियन (Centurion Cricket Ground) येथे तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.

83 The Movie
रणवीर सिंगचा '83' बॉक्स ऑफिसवर सुसाट; पहिल्याच दिवशी दमदार कमाई

'83' चित्रपट पाहिल्यानंतर कोहलीनं ट्विट केलंय, की भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात प्रतिष्ठित क्षण यापेक्षा चांगलाप्रकारे अनुभवता आला नसता. एका चित्रपटाच्या माध्यमातून 1983 च्या विश्वचषक स्पर्धेतील घटना आपल्याला पुन्हा अनुभवता येतेय, हे आमचं भाग्य आहे, असं तो म्हणाला 25 जून 1983 रोजी झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं 2 वेळा विश्वचषक विजेत्या वेस्ट इंडिजचा 43 धावांनी पराभव करून प्रथमच विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न पूर्ण केलं. भारतीय संघ 1983 मध्ये इंग्लंडमध्ये 'अंडरडॉग' म्हणून गेला होता आणि त्यावेळी वेस्ट इंडिजचा संघ अव्वल होता. भारताच्या (Team India) विजयावर कोणाचाही विश्वास नव्हता. पण, भारताच्या त्या ऐतिहासिक विजयानं जागतिक क्रिकेटमध्ये भारताची ओळख तर झालीच, पण त्या विजयानंतर भारतीय क्रिकेटचं नवे पर्व सुरू झालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.