Vishakha Subhedar: ह्रदयाचा आजार झालेला फॅन बंद घराबाहेर चिठ्ठी ठेऊन गेला, विशाखा सुभेदार म्हणतात, हे फीलिंग फार...

विशाखा सुभेदार यांच्या दाराबाहेर त्यांच्या फॅन्सने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे
Vishakha Subhedar reaction on fan drop a letter outside of home maharashtrachi hasyajaytra
Vishakha Subhedar reaction on fan drop a letter outside of home maharashtrachi hasyajaytra SAKAL
Updated on

Vishakha Subhedar News: विशाखा सुभेदार या महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री. विशाखा सुभेदार यांनी आजवर अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे.

अशातच विशाखा यांनी त्यांचा फॅन्सचा एक भन्नाट किस्सा सर्वांसोबत शेयर केलाय. विशाखा सुभेदार यांच्या दाराबाहेर त्यांच्या फॅन्सने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. काय म्हणाला फॅन बघुया..

(Vishakha Subhedar reaction on fan drop a letter outside of home maharashtrachi hasyajaytra)

Vishakha Subhedar reaction on fan drop a letter outside of home maharashtrachi hasyajaytra
Zinda Banda Jawan: सळसळती ऊर्जा, कडक डान्स.. शाहरुखच्या जवानचं पहिलं गाणं जिंदा - बंदा

विशाखा सुभेदार यांच्या फॅनची चिठ्ठी

शुभ आशिर्वाद,मी राजेंद्र य. माणगांवकर (MABEd. विद्याधिराजा हायस्कुल, भांडुप (पूर्व) येथे सहाय्यक शिक्षक म्हणून आहे. विशाखा ताई तुमचे जगाला लाखो चाहते आहेत. त्यातीलच मी एक आहे. परंतु फरक इतकाच की मी तुमचा भक्त आहे. देव तर कुणीच पाहिला नाही परंतु तुमच्या रूपात मी तुम्हास देव मानतो. यात खरच अजिबात अतिशयोक्ती नाही.

मला पंधरा वर्षापूवी हृदयाचा आजार झाला होता. मी खूप घाबरलो होतो कारण घरातील जबाबदाऱ्या खूपच होत्या औषधे चालूच होती आणि त्याच वेळी फू बाई फू मधील भाग पाहिला (श्री वैभव मांगले व तुम्ही) तो भाग माझ्या मनाला इसका भावला की तुमचा प्रत्येक भाग तहान भूक विसरून मी चाहू लागलो. आणि पुढील काही महिन्यातच मी पूर्ण बरा झालो. ही तुमचीच कृपा नाही तर काय. त्यानंतर हास्यजताचे भाग नियमित पाहू लागलो. हास्यजत्रेतील सर्वच कलाकार अगदी उत्कृष्ट काम करतात परंतु सतत तुमची उणीव जाणवते. पण मी मात्र आजही मागील भागांची वाट पहात असतो

दोन वर्षापूर्वी मी, माझी बायको व मुलगा मंदार कालीदास मध्ये शांतेच कार्ट चालू आहे' हे नाटक पहाण्यास गेलो होतो." तुम्हाला प्रत्यक्ष भेटण्याचा मोह झाला. मनात भीती असतानाही मी व मंदार मध्यंतरात तुम्हाम भेटलो. त्यावेळी माझी व मंदारची आपुलकीने चौकशी केली. मला असीम आनंद झाला.

पत्राचा पुढील मजकुर

नुकताच एक दिवस गवाणपाड्यात गेलो तेथे एका गृहस्थाला तुमचा पत्ता विचारला त्याने समोरच्या इमारतीकडे बोट दाखवले. मी दचकत दबकतच तुमच्या ८ व्या मजल्यावरील घराची बेल वाजवली. पण तुम्ही घरी नव्हता तुमच्या घरासमोरील एका व्यक्तीने तुम्ही बाहेरगांवी जात असे सांगितले. अमे दोन चार वेळा झाले.

त्यानंतर मी ५ व्या मजल्यावरील श्री पानवलकरांना भेटलो. त्यांनी मला दुसऱ्या दिवशी सकाळी १० चा आत येण्यास सांगितले. मी झालो. 1. दुसऱ्या दिवशी रिक्शाने येत असताच पानवलकरांनी फोन करून सांगितले की विशाखाताई आताच बाहेर गेज्या तुम्ही आता येऊ नका मी इमारतीखाली बसलो आहे तरी पण मी त्यांना भेटलो व त्या कधी भेटतील असे आशेने त्यांना विचारले

आता तर तुम्ही हास्यजतेतून बाहेर गेलात याचे मला अतिशय दुःख झाले सध्या तुम्ही निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. यात ही तुम्हाला घवघवीत यश प्राप्त होणार याची मला खात्री आहे. याही क्षेत्रात तुम्ही खूप बिझी असणार पण मन मानायला तयार नाही आणि कधीतरी .

एकदाच मला तुमची भेट घ्यायची आहे हे कृपया विसरू नका. तुम्हाला भावी आयुष्यासाठी माझ्याकडुन हार्दीक शुभेच्छा

तुमचा एक चाहता श्री राजेंद्र यशवंत माणगांवकर श्री. २४, ओम पराग मिलन सोसायटी संत रामदास मार्ग, मुलुंड (पूर्व)

विशाखा सुभेदार यांनी व्यक्त केल्या भावना

विशाखा सुभेदार म्हणतात.. फार कमाल फीलिंग आहे... जेव्हा एखादा चाहता आपल्याला भेटायला आपलं घर गाठतो.. आणि भेटच होतं नाही.. आणि मग एक चिठठी ठेवून जातो..
कलाकार म्हणून जन्माला आले त्या करिता देवाचे आभार.. आणि कलाकारांनवर प्रेम करणाऱ्या रसिकांचे आभार.

अशाप्रकारे विशाखा सुभेदार यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()