Vishakha Subhedar: विशाखा सुभेदार यांनी मानले राज ठाकरेंचे आभार, हे आहे खास कारण

म्हणून विशाखा यांनी मानले राज ठाकरेंचे आभार
vishakha subhedar thanks to mns chief raj thackeray and wish him happy diwali 2023
vishakha subhedar thanks to mns chief raj thackeray and wish him happy diwali 2023 SAKAL
Updated on

Vishakha Subhedar: विशाखा सुभेदार या मराठी मनोरंजन विश्वातल्या लोकप्रिय अभिनेत्री. विशाखा यांनी आजवर अनेक टीव्ही, नाटक, सिनेमे अशा अनेक माध्यमांमध्ये अभिनय केलाय. विशाखा यांनी विविध भुमिकांमधून प्रेक्षकांना खळखळुन हसवलं. महाराष्ट्राची कॉमेडी क्वीन म्हणुन विशाखा यांना ओळखलं जातं.

विशाखा यांच्या आयुष्यात एक खास गोष्ट घडली यामुळे त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंचे आभार मानले. काय घडलं नेमकं जाणुन घ्या.

vishakha subhedar thanks to mns chief raj thackeray and wish him happy diwali 2023
Tiger 3 Twitter Review: सलमान खानचा टायगर 3 पाहायला जाताय? लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या

म्हणून विशाखा यांनी मानले राज ठाकरेंचे आभार

विशाखा सुभेदार यांना मनसे प्रमुख राज ठाकरेंकडून खास दिवाळी गिफ्ट आणलंय. त्यानिमित्ताने विशाखा यांनी राज ठाकरेंकडून आलेल्या गिफ्टचा पोस्ट करुन त्यांचे आभार मानले आहेत.

विशाखा लिहीतात, साहेब मनापासून धन्यवाद..! तुमची गोष्टच भारी. इतकं लक्षात ठेवून डायरेक्ट घरी फराळ पाठवला. त्याबद्दल एक मनसे कार्यकर्ती म्हणून खूप आनंद झाला. जय मनसे.

विशाखा यांचं वर्कफ्रंट

विशाखा यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर.. त्या सध्या स्टार प्रवाहवरील शुभविवाह मालिकेत झळकत आहेत. या मालिकेत विशाखा साकारत असलेल्या भुमिकेचं सध्या कौतुक होतंय.

याशिवाय विशाखा सध्या प्रसाद खांडेकर लिखित - दिग्दर्शित कुर्रर्रर्र नाटकात अभिनय करत आहेत. या नाटकात विशाखा यांच्यासोबत प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, पॅडी कांबळे झळकत आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()