#Me Too Movement: विशाल आदित्य सिंग(Vishal Aditya Singh) हा छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध अभिनेता आहे. तो बिग बॉस १३ (Big Boss 13) मध्ये देखील सामिल झाला होता. अर्थात तिथं त्याचा प्रवास फार काळ चालला नाही, पण एक गोष्ट नाकारुन चालणार नाही की तेथील मोठ्या भांडणांमुळे तो भरपूर चर्चेत राहिला होता. याच प्लॅटफॉर्मवर तो म्हणाला होता, ''वयाच्या ९ व्या वर्षी माझं लैंगिक शोषण झालं होतं''. आता पुन्हा एका नव्या मुलाखतीत त्यानं याचा खुलासा केला आहे.(Vishal Aditya Singh recalls his molestation childhood metoo movement)
एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत विशाल आदित्य सिंगने म्हटलं आहे की, ''त्याचं होमटाऊन असलेल्या बिहारमध्ये त्याच्यासोबत ती विचित्र गोष्ट घडली होती. तो म्हणाला, त्यानं आपल्यावर झालेल्या लैंगिक शोषणाविषयी सांगितल्यावर त्याच्या गावातही एकप्रकारे #MeToo मोहिमेला सुरुवात झाली होती. या मोहिमेअंतर्गत त्यावेळी तब्बल १४ लोकांनी समोर येऊन आपल्यावर झालेल्या अत्याचारांना सर्वांसमोर ठेवलं होतं'',असं विशाल म्हणाला.
विशाल म्हणाला, ''सात आरोपी आणि १४ पीडित लोक,ज्यामध्ये माझी काकी देखील होती,आणि माझे तीन मित्र देखील होते. सगळ्यांनीच आपल्यावरील अन्यायाला सर्वांसमोर बोलून दाखवायची हिम्मत दाखवली. १४ लोक एकत्र बसले आणि त्यांनी आपल्यावरील शोषणाविषयी खुलासे केले. याआधी सगळेच गप्प राहिले,कोणीच काही बोललं नव्हतं''. विशाल पुढे म्हणाला,''लोक अशा गोष्टीवर बोलणं टाळतात,विषय दाबला जातो. कारण लोकांना वाटतं समाज आपल्यावर थू-थू करेल. आपलं तोंड काळं करेल. जेव्हा मी माझ्या वडीलांना त्यावेळी याविषयी सांगितलं होतं,तेव्हा त्यांनी मला मारलं होतं''.
विशालनं या मुलाखतीत त्याच्यावर लैंगिक शोषण कोणी केलेलं याविषयी देखील खुलासा केला आहे. विशाल त्या भयानक प्रसंगाला आठवत म्हणाला, ''ते माझ्याच एरियात राहणारे काका होते. गावात हे सगळं मोठ्या प्रमाणात होतं. पण लोक यावर विश्वास ठेवत नाही''.
विशालचं म्हणणं आहे की,तो जेव्हा मुंबईत शिफ्ट झाला तेव्हा त्याला लक्षात आलं की त्याच्यासोबत जे काही आधी घडलं ते योग्य नव्हतं. मग त्यानं आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडायचं ठरवलं. विशाल म्हणाला,''आपल्यावर अन्याय केलेला तो माणूस समोर आला की खूप राग-राग होतो. आपण गप्प का राहिलो ही चीड मनात राहून जाते. मला जेव्हा लक्षात आलं की माझ्यासोबत चुकीचं घडलेलं ,आणि मी यावर अॅक्शन घेऊ शकतो. तेव्हा मी लगेच गावाला गेलो,त्या काकांशी बोललो. मी त्यांना विचारलं की,जसं तुम्ही माझ्यासोबत केलं ते मी तुमच्या मुलांसोबत केलं तर? त्यानंतर लगेचच माझ्याशी ते कसे वागले याच्याविषयी सगळ्यांना कळलं होतं''.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.