मुंबई - बॉलीवूडमध्ये bollywood आपल्या वैशिष्ट्यपूर्ण दिग्दर्शनानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारे दिग्दर्शक म्हणून अनेकांची नावं सांगता येतील. अनुराग कश्यप anurag kashyap, आनंद एल राय anand l rai, दिबाकर बॅनर्जी dibakar bannerji, केतन मेहता ketan mehta, हंसल hansal mehata मेहता यांच्यासोबत विशाल भारव्दाजच vishal bharadwaj यांचं नावं घ्यावं लागेल. त्यांनी आपल्या दिग्दर्शनानं वेगवेगळ्या चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना दिली आहे. त्याच्या हैदर, ओमकारानं प्रेक्षकांच्या मनावर वेगळा ठसा उमटविला आहे. आजही चित्रपट रसिकांच्या आवडीच्या चित्रपटामध्ये विशाल भारव्दाज यांचा एकतरी चित्रपट हा असतोच. वेगळं कथानक, त्याची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी यामुळे विशाल भारव्दाज हे वेगळे दिग्दर्शक ठरतात. त्याच्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत असतात. आगामी काळात त्याचा एका वेगळ्या विषयावरचा चित्रपट येणार आहे. त्याच्या नावावरुनच प्रेक्षकांना त्यात वेगळेपणा दिसून येईल.
विशाल भारव्दाजचा त्याच्या हटकेपणाबदद्ल समीक्षकांनी देखील गौरविलं आहे. तो सध्याच्या घडीचा आघाडीचा दिग्दर्शक आहे. विशेष म्हणजे तो पटकथाकार, संवाद लेखक, संगीतकार अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका सहजपणे पार पाडत असल्याचे दिसून आले आहे. तो आता लव फिल्म्स आणि विशाल भारद्वाज फिल्म्स टी-सीरीजची प्रस्तुती असलेल्या 'कुत्ते'च्या निर्मितीसाठी एकत्र आले आहेत. त्याची घोषणा आज करण्यात आली. या चित्रपटाचे दिग्दर्शन आसमान भारद्वाज करत असून त्यांचा हा पहिला चित्रपट आहे. चित्रपटाची झलक सादर करण्याच्या उद्देशाने निर्मात्यांनी मोशन-पोस्टरचे अनावरण केले असून दर्शकांना एका रोमांचक सफरीचे वचन दिले असून अर्जुन कपूर, कोंकणा सेन शर्मा, नसीरुद्दीन शाह, कुमुद मिश्रा, राधिका मदान, शार्दुल भारद्वाज आणि तब्बू हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
'कुत्ते' लव फिल्म्स आणि विशाल भारद्वाज फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत बनणारी, लव रंजन, विशाल भारद्वाज, अंकुर गर्ग आणि रेखा भारद्वाज यांची निर्मिती आहे आणि गुलशन कुमार व भूषण कुमार यांच्या टी-सीरीजद्वारे प्रस्तुत करण्यात आली आहे. चित्रपटाचे संगीत विशाल भारद्वाज करणार असून याची गाणी गुलजार लिहिणार आहेत.आसमान आणि विशाल भारद्वाजद्वारे लिखित, 'कुत्ते' एक सेपर-थ्रिलर असून सध्या प्री-प्रोडक्शन स्टेजमध्ये आहे आणि साधारण 2021च्या शेवटी याच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल. आसमान स्कूल ऑफ विजुअल आर्ट्स, एनवाईसीमधून आपले फिल्म मेकिंग पदवीचे शिक्षण पूर्ण केले. आपल्या वडिलांना, विशाल भारद्वाज यांना '7 खून माफ', 'मटरु की बिजली का मंन्डोला' आणि 'पटाखा' यांमध्ये असिस्ट केले आहे.
कुत्ते'बाबत बोलताना विशाल भारद्वाज म्हणाले, 'कुत्ते' माझ्यासाठी विशेष आहे कारण आसमान आणि मी दिग्दर्शक- निर्माता म्हणून पहिल्यांदाच एकत्र येतो आहोत आणि तो यासोबत काय करणार आहे हे पाहायला मी उत्सुक आहे. लव फिल्म्स आणि विशाल भारद्वाज फिल्म्स देखील पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. भारव्दाज यांनी सांगितलं, मी चित्रपट निर्मिती आणि मजबूत व्यावसायिक समज यासाठी लव यांच्या धाडसी दृष्टीकोनाचे खरोखर कौतुक करतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.