'शेवटच्या क्षणी मी बाबांना भेटूसुद्धा शकलो नाही'; विशालने व्यक्त केलं दु:ख

शुक्रवारी विशालच्या वडिलांचं निधन झालं.
Vishal Dadlani with his father
Vishal Dadlani with his fatherInstagram
Updated on

गायक, संगीत दिग्दर्शक विशाल दादलानीचे (Vishal Dadlani) वडील मोती दादलानी यांचं शुक्रवारी निधन झालं. मात्र विशाल स्वत: कोविड पॉझिटिव्ह असल्याने शेवटच्या क्षणी वडिलांसोबत त्याला वेळ घालवता आला नाही. विशालने सोशल मीडियावर याबद्दलची पोस्ट लिहित दु:ख व्यक्त केलं. विशालचे वडील गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. अशा कठीण काळात आईसोबतही राहू न शकल्याची खंत त्याने या पोस्टद्वारे व्यक्त केली.

विशालची पोस्ट-

'श्री मोती दादलानी (१२ मे १९४३- ८ जानेवारी २०२२). माझे सर्वांत जवळचे मित्र, या जगातील सर्वांत दयाळू व्यक्ती.. माझ्या बाबांना मी गमावलं. माझ्या आयुष्यात त्यांच्यापेक्षा चांगला शिक्षक कोणीच असू शकत नाही. आज मी जो काही आहे, तो फक्त त्यांच्यामुळेच आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून ते आयसीयूमध्ये होते. पण मी त्यांना भेटू शकलो नाही, कारण मला कोरोनाची लागण झाली आहे. या कठीण काळात मी माझ्या आईसोबत राहू शकलो नाही. वडिलांशिवाय मी कसं जगावं हेच मला कळत नाहीये. मला काहीचं सुचेनासं झालं आहे', अशा शब्दांत विशालने भावना व्यक्त केल्या.

Vishal Dadlani with his father
'तो खूप कठीण काळ होता'; दीपिकाने सांगितला कोरोनाशी सामना करण्याचा अनुभव

विशालने शुक्रवारी सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याचा कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे त्याच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याची विनंती केली होती. विशालला सौम्य लक्षणं असून सध्या तो घरातच क्वारंटाइनमध्ये राहत आहेत. विशालच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत त्याचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.