Cm Eknath Shinde: मुंबई सेन्सॉर बोर्डाने घेतली लाच, अभिनेत्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार

सुप्रसिद्ध अभिनेत्याने मुंबई सेन्सॉर बोर्डाने लाच घेतल्याचा आरोप केलाय
 Vishal Tamil actor accuses Mumbai censor board office of corruption, points cm eknath shinde
Vishal Tamil actor accuses Mumbai censor board office of corruption, points cm eknath shindeSAKAL
Updated on

तामिळ अभिनेता आणि निर्माता विशालने त्याच्या नुकत्याच आलेल्या मार्क अँटनी या चित्रपटाच्या हिंदी सेन्सॉर अधिकारांसाठी सेंट्रल ब्युरो ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने 6.5 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केला आहे.

विशालने सोशल मीडियावर या समस्येकडे लक्ष वेधतानाचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडीओत त्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या घटनेकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.

(Vishal Tamil actor accuses Mumbai censor board office of corruption, points cm eknath shinde)

 Vishal Tamil actor accuses Mumbai censor board office of corruption, points cm eknath shinde
Siddharth: चालू पत्रकार परिषद सोडावी लागली, अभिनेता सिद्धार्थच्या कार्यक्रमात आंदोलकांचा राडा, हे ठरलं कारण

मुंबई सेन्सॉर बोर्डाने ६.५ लाथ रुपयाची लाच मागितली?

अभिनेता विशालने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, "रुपेरी पडद्यावर दाखवला जाणारा भ्रष्टाचार ठीक आहे. पण खऱ्या आयुष्यात हा भ्रष्टाचार पचवू शकत नाही. विशेषत: सरकारी कार्यालयांमध्ये. आणि त्याहूनही वाईट CBFC मुंबई कार्यालयात असं घडत आहे.

सिनेमा मंजूर होण्यासाठी 6.5 लाख रुपये मोजावे लागले. माझ्या चित्रपट Mark Antony च्या हिंदी आवृत्तीसाठी अशी घटना घडली. सिनेमाच्या स्क्रिनिंगसाठी 3 लाख आणि प्रमाणपत्रासाठी 3.5 लाख अशी लाच मागण्यात आली.

माझ्या कारकिर्दीत कधीही अशा परिस्थितीचा सामना केला नाही. चित्रपट रिलीज झाल्यापासून संबंधित मध्यस्थला खूप जास्त स्टेक देण्याशिवाय पर्याय नव्हता.

मुख्यमंत्री शिंदे आणि पंतप्रधानांकडे नोंदवली तक्रार

पुढे व्हिडीओ शेअर करताना विशाल म्हणतो, "महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आणि माझे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या ही घटना निदर्शनास आणून देत आहे. त्यामुळे भविष्यात कोणत्याही निर्मात्याच्या आयुष्यात अशी घटना घडणार नाही.

माझ्या कष्टाचे पैसे गेले भ्रष्टाचारासाठी??? पण दुसरा मार्ग नव्हता. सर्व ऐकण्यासाठी खाली पुरावा. आशा आहे की नेहमीप्रमाणे सत्याचा विजय होईल.". पुढे विशालने ज्या दोन व्यक्तींना पैसे पाठवले आहेत त्यांचे बँक डिटेल्स शेअर केलेत. आता या गंभीर घटनेमुळे संबंधितांवर कारवाई होणार का? हे पाहायचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.