Vivek Agnihotri On Adipurush: 'तुम्ही मोठं पाप केलंय, देव कसा माफ करेल?

द काश्मिर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आदिपुरुषवरुन सेन्सॉर बोर्डावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
Vivek Agnihotri On Om Raut Film Adipurush Controversy
Vivek Agnihotri On Om Raut Film Adipurush Controversy esakal
Updated on

Vivek Agnihotri On Om Raut Film Adipurush Controversy - ओम राऊत यांच्या आदिपुरुषवर जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट चर्चेत आला आहे. त्यावर कोर्टानं देखील ताशेरे ओढले आहेत. बॉलीवूडमधील काही सेलिब्रेटींनी देखील त्यावर कडाडून टीकाही केली आहे.

द काश्मिर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आदिपुरुषवरुन सेन्सॉर बोर्डावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या बोर्डानं नाराजी व्यक्त कशी काय केली नाही. त्यांनी मेकर्सला धारेवर का धरले नाही. असा प्रश्न विचारला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या गोष्टी व्हायला हव्या होत्या. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे मोठा वाद होतो आहे. असेही अग्निहोत्री यांनी म्हटले आहे.

प्रभास, सैफ अली खान, क्रिती सेनॉन यांच्या प्रमुख भूमिका असलेला आदिपुरुष हा २०२३ मधील सर्वाधिक चर्चेतील चित्रपट म्हणावा लागेल. या चित्रपटानं तीनशे कोटींपेक्षा जास्त कमाईही केली आहे. या चित्रपटातील संवाद, कलाकार, दिग्दर्शन यावरुन नेटकऱ्यांनी वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले आहेत.

काय म्हणाले विवेक अग्निहोत्री?

तुम्ही जर माझ्या गेल्या काही दिवसांतील प्रतिक्रिया पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल की मी कोणत्याही चित्रपटावर कुठलीच प्रतिक्रिया देत नाही. मी दुसरे कुणी काही कलाकृती तयार करतात त्यांच्यावरही काहीच बोलत नाही. तो चित्रपट चांगला असो किंवा वाईट मी बोलत नाही. आपल्या बोलण्याचा अनेकजण चूकीचा अर्थ काढतात आणि त्याचे वेगळेच परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. मात्र मला एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे लोकांच्या भावनांशी खेळू नका.

भावनेपुढे सगळे फिके...

भावनेशी खेळू नका. तसे झाल्यास लोकांचा विश्वास उडतो. आदिपुरुषच्या बाबत तसे म्हणावे लागेल. मीच नाही अनेकांनी त्याविषयी आपली मतं मांडली आहेत. तुम्ही जर एखाद्या भावनेशी संबंधित गोष्टीवर चित्रपट कलाकृती तयार करत असाल तर त्याचा वेगळा विचार करण्याची गरज आहे. एखाद्या आईला तिचं बाळ हे चांगलेच वाटते. त्यात कुणी नावं ठेवल्यावर तिला आवडत नाही. तसेच आईचं प्रेम आणि आस्था यांच्याविषयी कुणीही काही बोलू नये.

Vivek Agnihotri On Om Raut Film Adipurush Controversy
Kangana Emergency: या तारखेला पुन्हा लागणार 'आणीबाणी', कंगनाच्या सिनेमाची रिलीज डेट समोर

तुम्ही पापपूर्ण काम केले आहे.देव तुम्हाला कसे माफ करेल. अशा शब्दांत अग्निहोत्री यांनी आदिपुरुषवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. यापूर्वी देखील त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे या चित्रपटावर निशाणा साधला होता. अलाहाबाद कोर्टानं देखील आदिपुरुषच्या मेकर्सवर कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

Vivek Agnihotri On Om Raut Film Adipurush Controversy
'Sara Ali Khan'च्या मंदिरात जाण्याने पुन्हा रंगला वाद!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.