'द काश्मिर फाईल्सच्या' (The Kashmir Files) दिग्दर्शकांनी आपल्या आगामी सिनेमाविषयी मोठी घोषणा केली आहे. अर्थातच 'द काश्मिर फाईल्स' या सिनेमाला मिळालेल्या यशानंतर विवेक अग्निहोत्री(Vivek Agnihotri) आता नेमका कोणता सिनेमा आणतायत,आणि त्याचं कथानक कोणतं सत्य उलगडवतंय याकडे सगळ्यांचच लक्ष लागून राहिलं होतं. त्याविषयीच विवेक अग्निहोत्रींनी माहिती दिली आहे. त्यांच्या या आगामी सिनेमाचं नाव आहे 'द दिल्ली फाईल्स'(The Delhi Files).
या आपल्या 'द दिल्ली फाईल्स' या आगामी सिनेमाविषयी एका पोस्टच्या माध्यमातून विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीटरवरनं माहिती दिली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी स्वतःचा फोटो शेअर करीत लिहिलं आहे की,''मी माझ्या 'द काश्मिर फाईल्स' सिनेमावर ज्यांनी-ज्यांनी प्रेम केलं त्या सर्वांचा आभारी आहे. मी खूप प्रामाणिकपणे 'द काश्मिर फाईल्स' सिनेमावर गेली चार वर्ष कष्ट घेतले होते. मी कदाचित तुम्हाला खुप मागे घेऊन गेलो,भूतकाळाच्या जखमा पुन्हा जागवल्या पण काश्मिरी पंडितांसोबत जे घडलं होतं त्यावेळी, त्या अत्याचाराविषयी जाणून घेण्याचा हक्क एक भारतीय म्हणून प्रत्येकाला होता. आता वेळ आहे आणखी एक नवं सत्य समोर आणण्याची,माझ्या नव्या सिनेमावर काम करण्याची''. ट्वीटरवरील त्या पोस्टच्या माध्यमातून 'द दिल्ली फाईल्स' हे नव्या सिनेमाचं नाव त्यांनी सूचित केलं आहे.
'द काश्मिर फाईल्स' ११ मार्च रोजी जगभरात प्रदर्शित झाला होता. १९९० सालात काश्मिरी पंडितांसोबत झालेल्या अत्याचारावर या सिनेमातून भाष्य करण्यात आलं होतं. या सिनेमात अनुपम खेर(Anupam Kher),पल्लवी जोशी,मिथुन चक्रवर्ती,दर्शन कुमार,चिन्मय मांडलेकर,मृणाल कुलकर्णी असे कलाकार होते. सिनेमाच्या प्रदर्शनाआधीपासूनच अनेक वादांमुळे तो चर्चेत राहिला. राजकीय खडाजंगी देखील या सिनेमामुळे झाली. पण याचा सिनेमाच्या बॉक्सऑफिस कलेक्शनवर काहीच परिणाम झाला नाही. सिनेमानं भारभरात ३३० करोडचा बिझनेस आतापर्यंत केला आहे. सिनेमा भारतातील काही राज्यात टॅक्स फ्री करण्यात आला होता. भाजपची सत्ता जिथे जिथे आहे अशा मध्यप्रदेश,उत्तरप्रदेश,गुजरात मध्ये सिनेमा टॅक्स फ्री केला गेला.
काही दिवसांपूर्वीच ट्विंकल खन्नानं सोशल मीडियावर सिनेमाविरोधात भाष्य केल्यामुळं तिला नेटकऱ्यांनी फैलावर घेतलं होतं. तिनं 'द काश्मिर फाईल्स' या नावाची खिल्ली आपल्या कॉलममध्ये उडवली होती. विवेक अग्निहोत्री यांनी 'द काश्मिर फाईल्स' सिनेमापूर्वी 'द ताश्कंद फाईल्स' हा सिनेमा बनवला होता. जो पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या 1966 साली झालेल्या रहस्यमय निधनावर भाष्य करणारा होता. आता 'दिल्ली फाईल्स' मध्ये नेमकं कोणतं सत्य जगासमोर आणणार आहेत विवेक अग्निहोत्री याचीच चर्चा रंगली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.