Vivek agnihotri : काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय लोकांसमोर आणणाऱ्या THE KASHMIR FILES 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकल्याने जवळपास २५० कोटींहून अधिक कमाई या चित्रपटाने केली. जितके यश या चित्रपटाला मिळाले तितकेच वादही निर्माण झाले. हा चित्रपट रिलीज होण्याआधीच या वादाला सुरुवात झाली. चित्रपट प्रदर्शित होऊन वीस दिवस उलटले तरी अद्याप यावरील वाद थांबलेला नाही. एका विशिष्ट विचारधारेने हा मुस्मिल द्वेषी चित्रपट असल्याचा आरोप केला तर दुसऱ्या विचारधारेने आजवर लपवले गेलेले सत्य जगासमोर आणले म्हणून या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतले. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनीही या चित्रपटसह केंद्र सरकारवर टीका केली. या टीकेला विवेक अग्निहोत्री यांनीही सडेतोड उत्तर दिले आहे. पवारांच्या विधानाला खोडून काढणारे ट्विट त्यांनी केले आहे. (Vivek Agnihotri on Sharad Pawar)
शरद पवार यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'द काश्मीर फाइल्स'चा उल्लेख केला. यावेळी त्यांनी चित्रपटासह केंद्र सरकारवरही निशाणा साधला. या वक्तव्याबाबत खुद्द ANI ने ट्वीट करून माहिती दिली. “एका व्यक्तीने असा चित्रपट (द काश्मीर फाईल्स) तयार केला असून त्यात हिंदूंवर झालेले अत्याचार दाखवण्यात आले आहेत. बहुसंख्याक नेहमीच अल्पसंख्याकांवर हल्ले करतात आणि जेव्हा मुस्लीम वर्ग बहुसंख्यांकांमध्ये येतो तेव्हा हिंदू समाज असुरक्षित होतो, असे विचार या चित्रपटातून दाखवण्यात आले आहेत आणि सत्तेत असणारे लोक या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत ही दुर्दैवी बाब आहे.” असे पवार म्हणाले.
या ट्विट नंतर विवेक अग्निहोत्री यांनीही उत्तर दिले असून हा वाद अधिकच चिघळला आहे. आजवर काश्मीर फाइल्स चित्रपटावर झालेल्या प्रत्येक आरोपांवर आणि टीकेवर विवेक अग्निहोत्री यांनी उत्तर दिलेले आहे. वेळप्रसंगी कठोर शब्दात टीकाही केली आहे. आता शरद पवार यांच्या वक्तव्यालाही त्यांनी ट्वीट करत उत्तर दिले आहे. “एका व्यक्तीचे नाव विवेक रंजन अग्निहोत्री आहे. काही दिवसांपूर्वी तो तुम्हाला विमानात भेटला होता. त्याने तुमच्या आणि तुमच्या पत्नीच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. त्यावेळी काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अन्यायावर सर्वोत्कृष्ट चित्रपट बनवल्याबद्दल तुम्ही त्या व्यक्तीचे आणि त्याच्या पत्नीचे अभिनंदनही केले.” असे ट्वीट विवेक अग्नीहोत्रींनी केले आहे.
या ट्विटच्या माध्यमातून विवेक अग्निहोत्री यांनी शरद पवारांवर उपरोधिक टीका केली आहे. चित्रपटाबाबत त्यांनी घेतलेली दुटप्पी भूमिका उघड करण्याचा प्रयत्न विवेक यांनी केला. जी व्यक्त काल कौतुक करते ती आज टीका कशी करू शांत असा संभ्रम अग्निहोत्रींच्या मनात आहे. त्यांच्या ट्विटमुळे आता या वादाला कोणते नवे वळण मिळणार अशी चर्चा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.