Vivek Agnihotri: लाल बहादूर शास्त्री मृत्यू या हत्या? विवेक अग्निहोत्रींची मोठी घोषणा

लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त दिग्दर्शक विकेक अग्निहोत्री यांनी मोठी घोषणा केली आहे.
vivek agnihotri launched his book based on lal bahadur shastri death mystery in hindi who killed shahstri
vivek agnihotri launched his book based on lal bahadur shastri death mystery in hindi who killed shahstrisakal
Updated on

vivek agnihotri: काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय अत्याचार हा प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी द काश्मीर फाईल्सच्या निमित्तानं प्रेक्षकांसमोर आणला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 300 कोटींपेक्षा जास्त कमाई करुन लक्ष वेधून घेतले होते. या चित्रपटाला देशभरातून मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. पण या चित्रपटावरून वादही भडकले. अनेकांनी या चित्रपटामुळे समाजात द्वेष निर्माण होईल असेही म्हंटले होते. पण विवेक अग्निहोत्री मात्र सर्वांना सडेतोड उत्तर देत होते. लवकरच ते ‘दिल्ली फाईल्स’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. पण त्या पूर्वीच २ ऑक्टोबर म्हणजेच लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून एक मोठी घोषणा केली आहे.

(vivek agnihotri launched his book based on lal bahadur shastri death mystery in hindi who killed shahstri)

विवेक अग्निहोत्री यांनी लिहिलेल्या लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावरील पुस्तक आता हिंदी भाषेत वाचकांच्या भेटीस येणार आहे. आपल्या ट्विटरवर अकाऊंटनवरून त्यांनी ही माहिती दिली. 'ताश्कंत फाईल्स' हा चित्रपट लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूवर आधारित चित्रपट होता. या चित्रपटाचेदेखील कौतुक झाले होते. याच धर्तीवर त्यांनी 'who killed shahstri' हे पुस्तक लिहले. या पुस्तकाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. हेच पुस्तक आता हिंदी मधून उपलब्ध होणार आहे.

विवेक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, 'तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त भारतातील सर्वोत्कृष्ट असे पुस्तक who killed shahstri आता हिंदी भाषेत उपलब्ध होत आहे’, यासोबत त्यांनी पुस्तकाचा फोटोदेखील शेअर केला आहे.

लाल बहादूर शास्त्री भारताचे दुसरे पंतप्रधान होते. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा मोलाचा वाटा होता. ताश्कंत येथे ते गेले असताना त्यांचा मृत्यू झाला. विवेक अग्निहोत्री यांनी या घटनेचा अभ्यास करून ताश्कंत फाईल्स चित्रपट बनवला होता. या चित्रपटात पंकज त्रिपाठी, पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती, नसरुद्दिन शाह मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट २०१९ साली प्रदर्शित झाला होता. आता हाच सर्व इतिहास आपल्याला पुस्तकरूपात तेही हिंदीमध्ये उपलब्ध होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.