Vivek Agnihotri: गेल्या काही दिवसांपासून सिनेमांवर बंदी आणण्याचं प्रमाण वाढताना दिसत आहे. नवाझुद्दिन सिद्दिकीनं स्पष्टिकरण देत यासंदर्भात आपलं मत मांडलं होतं पण आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यावर अतिशय तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी नवाझवर थेट निशाणा साधत विचारलं की तुझ्या सिनेमांवर आणि ओटीटीवर येणाऱ्या सीरिजवर देखील बंदी आणायला हवी.(Vivek Agnihotri questioned at nawazuddin siddiqui alleged statement on banning the kerala story)
काही दिवसांपूर्वी मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार नवाझुद्दिन सिद्दिकीनं 'द केरळ स्टोरी'वर काही राज्यात आणलेल्या बंदीचं समर्थन केलं होतं. मात्र त्यानंतर अभिनेत्यानं या बातम्या खोट्या असल्याचं म्हटलं होतं आणि यावर स्पष्टिकरण देत म्हटलं होतं की 'कधीच कोणत्या सिनेमावर बंदी यावी असं मला चुकूनही वाटणार नाही'.
आता सिने-निर्माता आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी नवाझुद्दिन सिद्दिकीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावर अभिनेत्यानं स्पष्टिकरण देत म्हटलं आहे की, द केरळ स्टोरीवरील बंदीचं तो मुळीच समर्थन करत नाही.
विवेक अग्निहोत्री यांनी नवाझुद्दिन सिद्दिकीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत ट्वीट केलं आहे,
''भारतातील बहुतांशी मध्यमवर्गीय कुटुंबाना सिनेमा आणि ओटीटी सीरिजमधनं कोणत्याही कारणाशिवाय अपमानित केलं जातं किंवा पीडित तरी दाखवलं जातं. नवाझुद्दिन सिद्दिकीच्या सिनेमांवर आणि ओटीटीवरील सीरिजवर बंदी आणायला हवी खरंतर. यावर तुमचं मत काय आहे?''
याआधी नवाझुद्दिन सिद्दिकीनं ट्वीट करत लिहिलं होतं..
''काही व्ह्यूज आणि हिट्स मिळवण्यासाठी खोट्या बातम्या पसरवू नका. याला चीप टीआरपी म्हणतात. मी कधीच कोणत्याही सिनेमावर बंदी आणावी असं म्हटलं नाही. सिनेमांवर बंदी आणलीच नाही पाहिजे. खोट्या बातम्या पसरवू नका''.
'द केरळ स्टोरी' सिनेमाविषयी नवाझुद्दिन सिद्दिकीनं केलेल्या वक्तव्यावर आता विवेक अग्निहोत्रीनं प्रतिक्रिया देत नवाझुद्दिनचे सिनेमे आणि ओटीटी सीरिजवर बंदी आणायला हवी असा थेट सवाल करत खळबळ उडवली आहे.
'द केरळ स्टोरी'मध्ये अदा शर्मा,योगिता बिहानी,सोनिया बलानी आणि सिद्धि इदनानी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमानं बॉक्सऑफिसवर २०० करोडहून अधिक कमाई केली आहे. हा सिनेमा भारतात ISIS चा प्रोपेगेंडा आणि दहशतवाद पसरवण्याच्या अजेंडेला समोर आणतो. याचं दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केलं होतं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.