Vivek Agnihotri: 'मला आठवतंय पूजा-पाठची मस्करी करत हा म्हणाला होता..', विराटवर अग्निहोत्रींनी साधला निशाणा

विराट कोहलीचं पूजा-पाठ विरोधातील एक जुनं विधान पुन्हा चर्चेत आणत अह्मिहोत्रींनी क्रिकेटरच्या उज्जैन मंदिरातील पूजेसंदर्भात रिअॅक्शन दिली आहे.
Vivek Agnihotri reaction on anushka-virat visit to ujjain temple
Vivek Agnihotri reaction on anushka-virat visit to ujjain templeGoogle
Updated on

Vivek Agnihotri: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा आज सकाळी मध्यप्रदेश मधील उज्जैन इथल्या महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दोघांनी एकत्र आरती केली. यादरम्यान विराट-अनुष्कानं भारतीय पारंपरिक कपडे घातले होते. पूजा केल्यानंतर दोघांनी काही काळ मंदिरात घालवला.

त्या दोघांचा मंदिरात पूजा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता 'द काश्मिर फाईल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी हा व्हिडीओ शेअर करत काळाप्रमाणे लोक बदलतात जी चांगली गोष्ट आहे असं लिहिलं आहे.(Vivek Agnihotri reaction on anushka-virat visit to ujjain temple)

Vivek Agnihotri reaction on anushka-virat visit to ujjain temple
Akshay Kumar Video: 'पोटासाठी काय काय करतो बिचारा..',घागरा घालून अक्षयला नाचताना पाहून ट्रोलर्सनी साधला निशाणा

विवेक यांनी विराटच्या त्या एका विधानाचा उल्लेख केला आहे जे त्यानं एका पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. मी एका पूजा पाठ करणाऱ्या व्यक्तीसारखा वाटतो का असं विराट तेव्हा म्हणाला होता. विराटचा हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट करत लिहिलं आहे की,''मला आठवतं की विराटनं पूजा-पाठ सारख्या देवाधर्माशी संबंधित गोष्टीची खिल्ली उडवत जेव्हा म्हटलं होतं की मी पूजा-पाठ टाईप्स दिसतो का. तेव्हा विराट खूपच यंग होता. त्याच्या त्या वक्तव्याला ट्वीटरवर ट्रोल केलं गेलं होतं''.

Vivek Agnihotri reaction on anushka-virat visit to ujjain temple
Marathi Serial: सातव्या मुलीची सातवी मुलगी..व्हिलन रुपाली नाहीच..नव्या प्रोमोनं समोर आणला खऱ्या व्हिलनचा चेहरा

विवेक पुढे म्हणाले, ''लोक बदलतात. आणि ही चांगली गोष्ट आहे. कारण बदल तुमच्या आयुष्याला अर्थपूर्ण बनवतात''.

इंदौरमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान होणाऱ्या तिसऱ्या टेस्ट मॅचच्या एक दिवस नंतर विराट मंदीरात पोहोचला म्हणून चर्चा सुरू झाली आहे. अनुष्कानं एएनआयला आपल्या या यात्रेविषयी बोलताना सांगितलं की,''आम्ही मंदिरात पूजेसाठी गेलो होतो आणि महाकालेश्वर मंदिरात आम्हाला देवाचं खूप छान दर्शन झालं''.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()