'आप'च्या 'राजपूत कार्ड'वर भडकले विवेक अग्निहोत्री, म्हणाले...

विवेक अग्निहोत्री यांनी दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा
Vivek Agnihotri And Manish Sisodia News
Vivek Agnihotri And Manish Sisodia Newsesakal
Updated on

Vivek Agnihotri Comment On Manish Sisodia : दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्यात भ्रष्टाचाराचे आरोप असलेले उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आता जातीचे कार्ड खेळले आहे. स्वत:ला राजपूत म्हणवून घेत त्यांनी आपण कोणाच्याही पुढे झुकणार नाही असे म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) सिसोदिया यांच्यावर जातीचा आधार घेतल्याचा आरोप करत प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान, काश्मीर फाइल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनीही त्यांना तिखट प्रश्न विचारला आहे. इतर जाती झुकणार आहेत का, असा सवाल त्यांनी सिसोदिया यांना विचारला आहे.

Vivek Agnihotri And Manish Sisodia News
Neha Kakkar 'रिअॅलिटी शो'मध्ये का रडते? ट्रोलिंगवर दिले स्पष्टीकरण

विवेक अग्निहोत्री ट्विटमध्ये म्हणतात, की हा कोणत्या प्रकारचा जातीयवाद आहे? म्हणजे राजपूत नसलेल्या मनीष सिसोदियाने जर वाकले असते तर ते कापले असते. म्हणजे दिल्लीत राहणारे ब्राह्मण, यादव, गुज्जर, जाट, शीख वगैरे सगळे नतमस्तक होतात का? मुस्लिम, ख्रिश्चन, दलित… हे सगळे झुकणारे समुदाय आहेत का?”

मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी सोमवारी सकाळी दावा केला की, त्यांना आम आदमी पक्षामधून (आप) भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली गेली होती. सिसोदिया यांनी स्वत:ला राजपूत असल्याचे सांगून आपण झुकणार नसल्याचे सांगितले.

Vivek Agnihotri And Manish Sisodia News
विजय देवरकोंडा बुरखा घालून थिएटरमध्ये... अभिनेत्यानं सांगितला मजेदार किस्सा

सिसोदिया यांनी ट्विट केले की, मला भाजपचा संदेश मिळाला आहेस 'आप' सोडून भाजपमध्ये सामील व्हा, सीबीआय ईडीची सर्व प्रकरणे बंद केली जातील. भाजपला माझे उत्तर, मी महाराणा प्रताप यांचा वंशज आहे. मी राजपूत आहे. मी माझे डोके कापून टाकीन, परंतु भ्रष्ट-कारस्थानी लोकांसमोर झुकणार नाही. माझ्यावरील सर्व खटले खोटे आहेत. जे करायचं ते करा."

Vivek Agnihotri And Manish Sisodia News
बाॅलीवूडच्या 'या' दिग्गज कलाकारांनी कष्टाने मिळविले यश

पूर्वीही रंगले वाक् युद्ध

विवेक अग्निहोत्री आणि आम आदमी पार्टीमध्ये यापूर्वीही शाब्दिक चकमकी झाल्या आहेत. अरविंद केजरीवाल यांनी 'द काश्मीर फाइल्स'ला खोटा चित्रपट म्हणून संबोधल्याने मोठा गदारोळ झाला होता. अग्निहोत्री यांनी यापूर्वी अनेकदा आपवर टीका केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.