Ranveer वादात विवेक अग्निहोत्रींची उडी; म्हणाले,'हा मुर्खपणा...'

रणवीर सिंगनं एका मॅगझीनसाठी न्यूड फोटोशूट केलं अन् त्यानंतर अनेकांनी त्याची प्रशंसा केली तर बऱ्याचजणांनी त्याला फटकारलं देखील आहे.
Vivek Agnihotri REACTS to FIR filed against Ranveer Singh for his nude photoshoot
Vivek Agnihotri REACTS to FIR filed against Ranveer Singh for his nude photoshootEsakal
Updated on

रणवीर सिंगनं(Ranveer Singh) एका मॅगझीनसाठी न्यूड फोटोशूट(Nude Photoshoot) केलं आणि त्यामुळे सोशल मीडियावर वादाचं जोरदार वादळ घोंघावू लागलं. आता बातमी समोर आलीय की मुंबई पोलिसांनी रणवीर सिंगविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला आहे.(Vivek Agnihotri REACTS to FIR filed against Ranveer Singh for his nude photoshoot)

Vivek Agnihotri REACTS to FIR filed against Ranveer Singh for his nude photoshoot
Ranveer चे न्यूड फोटो काढणारा फोटोग्राफर आला समोर, सांगितली 'अंदर की बात'

या वादात द काश्मिर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी देखील आता उडी घेतली आहे. त्यांनी संपूर्ण प्रकरणावर भाष्य करत म्हटलं आहे,''रणवीर विरोधात FIR म्हणजे मुर्खपणाचा कळस. दिग्दर्शकाचं म्हणणं आहे उगाचच कुठल्याही कारणाशिवाय या विषयाला मोठं केलं जात आहे. FIR मध्ये लिहिलं आहे की रणवीरच्या न्यूड फोटोमुळे महिलांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. पण मी एक प्रश्न इथे विचारतो की, महिलांचे कितीतरी न्यूड फोटो आपण पाहतो, तेव्हा पुरुषांच्या भावना दुखावत नाहीत का?''

Vivek Agnihotri REACTS to FIR filed against Ranveer Singh for his nude photoshoot
Bollywood v/s South: अखेर सलमाननं तोडली चुप्पी, भरोसा वाटत नाही म्हणाला...

याच विषयाला धरुन पुढे विवेक अग्निहोत्री म्हणाले आहेत की,''आपल्या संस्कृतीत मानवी शरीराला नेहमीच वरचा दर्जा दिला आहे, त्याचा सम्मान केला आहे. मानवी शरीर ही देवानं निर्माण केलेली सर्वात सुंदर निर्मिती आहे. पण आपण मात्र इतक्या संकुचित वृत्तीने याला घृणा वाटेल असं जे लेखत आहोत ते खरंच चांगलं नाही. आणि मी याला कधीच पाठिंबा देणार नाही''. एका हिंदी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत द काश्मिर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी रणवीर सिंग न्यूड फोटोशूट वादावर तिखट प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Vivek Agnihotri REACTS to FIR filed against Ranveer Singh for his nude photoshoot
KWK 7: 'माझ्या बर्थ डे पार्टीत अनन्या आणि आदित्य...,मी पाहिलं',करणचा खुलासा

रणवीर सिंगविरोधात चेंबूर पोलिस ठाण्यात एका NGO ने आणि एका महिला वकीलाने तक्रार नोंदवली होती. NGO आणि महिला वकीलाने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे की,रणवीरच्या न्यूड फोटोंमुळे महिलांच्या भावना दुखावल्या आहेत. यामुळे त्याला शिक्षा व्हावी अशी देखील मागणी केली आहे. या तक्रारींची दखल घेत रणवीरला पोलिसांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. आता यावर रणवीर सिंग कशी कायदेशीर लढाई लढतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()