Vivek Agnihotri on Aishwarya Rai at Cannes 2023: कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये यंदा भारतीय आणि आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी थिरकले. चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी रेड कार्पेटवर अभिनेत्री आणि तिच्या असिस्टंटबद्दल ट्विट केले आहे.
विवेक अग्निहोत्रींनी ऐश्वर्याच्या रेड कार्पेटबद्दल खोचक टिपणी केली. त्यामुळे विवेक अग्निहोत्रींना ट्रोल व्हावं लागलं. ऐश्वर्याने मोठ्या हुडसह चांदीच्या गाऊनमध्ये पोज दिली, तर काळ्या सूटमध्ये असलेल्या एका व्यक्तीने अभिनेत्रीला तिच्या गाऊन रेड कार्पेटवर पसरविण्यात मदत केली.
(Vivek Agnihotri reply to trollers who troll Aishwarya Rai over her dress at cannes 2023)
विवेक अग्निहोत्रींची पोस्ट:
ऐश्वर्या रायचा फोटो शेअर करत विवेकने लिहिले की, 'तुम्ही 'पोशाख गुलाम' (Costume Slaves) हा शब्द ऐकला आहे का? या बहुतेक मुली आहेत (यावेळी मात्र एक माणूस दिसतोय).
तुम्ही असे गुलाम आता भारतातील जवळपास प्रत्येक महिला सेलिब्रिटींसोबत पाहू शकता. अशा अस्वस्थ फॅशनसाठी आपण इतके मूर्ख आणि अत्याचारी का बनत आहोत?
काहींनी विवेकशी सहमती दर्शवली, तर अनेकांनी त्याला ऐश्वर्याला बोलल्याबद्दल प्रश्न केला. एका ट्विटर युजरने तर ‘तुम्ही का जळत आहात, कान्सने तुम्हाला आमंत्रित केले नाही’, असा सवालही केला.
दुसर्याने ट्विट केले, "वैयक्तिक निवड! तुमचा कोणताही व्यवसाय बरोबर नाहीये." एका ट्विटमध्ये असेही लिहिले आहे, "मला वाटते की ब्रँड कंपनी कार्पेटवर त्यांचा ब्रँड दिसण्यासाठी अभिनेत्रीला पैसे देतात. शेवटी, हा शो-बिझचा एक भाग आहे."
दरम्यान, एका ट्विटर युजरने विवेकच्या म्हणण्याशी सहमती दर्शवत लिहिले की, 'जो ड्रेस घालतो, तिची जबाबदारी त्याची स्वतःची असावी. या महिलेचे लाड करणे बंद झाले पाहिजे.
दुसरा म्हणाला, "ते खरे तर हे परिधान करून चित्रपट पाहतात? यार, ते चित्रपट कसे एन्जॉय करतात? एवढं परिधान करुन खूप अस्वस्थ असले पाहिजेत."
अशाप्रकारे विवेक अग्निहोत्री यांना ऐश्वर्या रायच्या फॅन्सनी चांगलंच खरपूस समाचार घेतलाय. विवेक अग्नीहोत्री द काश्मीर फाईल्स सिनेमामुळे चर्चेत आले. गेल्या अनेक दिवसांपासून विवेक विविध विषयांवर त्यांची परखड अन् स्पष्ट मतं मांडत असतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.