Vivek Agnihotri on Cannes: बोगस कान्स! अग्निहोत्रींचा संताप ट्विट करत नाराजी

vivek agnihotri,
vivek agnihotri, Esakal
Updated on

Vivek Agnihotri on Cannes: 'कान्स फिल्म फेस्टिव्हल' हा फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात मोठा फेस्टिव्हल मानला जातो. जो सध्या मोठ्या उत्साहात सुरु आहे. 76 व्या आंतरराष्ट्रीय कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक भारतीय अभिनेत्रीनी सहभाग घेतलाय. ज्यात ऐश्वर्या राय बच्चन ते सारा अली खान, मृणाल ठाकूर आणि उर्वशी रौतेला, ईशा गुप्ता यांसारख्या अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे. 16 मे पासून सुरू झालेला हा फेस्टीव्हल 27 मे पर्यंत चालणार आहे. सर्वत्र याचीच चर्चा सुरु आहे.

मात्र यातच चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी पुन्हा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल' बद्दल ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमधुन त्यांनी फिल्म फेस्टिव्हलवर टिका केली आहे.

अग्निहोत्री हे त्यांच्या राजकीय, सामाजिक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. आपल्या परखड आणि सडेतोड वक्तव्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या अग्निहोत्रीं यांनी पुन्हा एकदा आपलं म्हणणे मांडले.

vivek agnihotri,
Anupam Kher injured: चित्रीकरणा दरम्यान अनुपम खेर यांना गंभीर दुखापत..

कान्सच्या रेड कार्पेटवरीला अनेक सेलेब्सना दाखवणाऱ्या एका वृत्तपत्राचा फोटो शेअर करत त्यांनी ट्विट केले की, 'कान्स फिल्म फेस्टिव्हलचा मृत्यू पाहून खूप वाईट वाटलं. यातील बहुतेक जण प्रसिद्ध अभिनेतेही नाहीत किंवा त्यांचे कोणतेही चित्रपट कान्समध्ये दाखवले जात नाहीत. चित्रपटांची जागा फॅशनने घेतली आहे. एस.एम. प्रभावशाली, चित्रपट पत्रकारिता... तुम्हाला माहीत आहे काय... आणि फिल्ममेकर्स…... त्यांची काळजी कोणाला आहे? ओम शांती!'

vivek agnihotri,
Virat Kohli : अनुष्कानं 3 वेळा केलेला 'फ्लाईंग किस' गेला वाया! कोहलीच्या डोळ्यात पाणी

काही दिवसांपुर्वी अग्नीहोत्री यांनी ऐश्वर्याबद्दलही एक पोस्ट शेअर केली होती आणि पोशाख गुलामांच्या वापराचा निषेध केला. त्यावर उर्फी जावेदनेही ट्विट केली होते.

त्यानंतर त्यांनी पुन्हा ट्विट केले ज्याची खुप चर्चाही झाली होती. ज्यात त्यांनी ट्विट लिहिले होते की, 'कान्स फिल्म फेस्टिव्हल हा चित्रपटांविषयी आहे हे तुम्हाला माहिती आहे का? मला वाटलं की हा फॅशन शो आहे असे तुम्हाला वाटत असल्यास मी तुम्हाला आठवण करून द्यावी.

दोन दिवसांपूर्वी त्याने ट्विट केले होते की, 'कान्स फिल्म फेस्टिव्हल हा चित्रपटांबद्दल आहे हे तुम्हाला माहिती आहे का? मला वाटले की हा फॅशन शो आहे असे तुम्हाला वाटत असल्यास मी तुम्हाला आठवण करून द्यावी. त्याने कान्समध्ये सिल्व्हर कलरच्या पोशाखात ऐश्वर्या रायचा फोटोही शेअर केला आणि पोशाख गुलामांच्या वापराचा निषेध केला.

vivek agnihotri,
Drishyam Remake In Korea: '२ ऑक्टोबर अन् सत्संग..', आता कोरियातही दिसणार 'विजय साळगावकर'! बनणार 'दृश्यम'चा रिमेक

चित्रपट अभिनेत्री नंदिता दास हिने देखील कान्स फिल्म फेस्टिव्हल बद्दल एक पोस्ट शेअर केली होती ज्यात तिने कान्स फिल्म फेस्टिव्हलबद्दल एक लाबंलचक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये नंदिताने म्हटले आहे की, 'यंदा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये न गेल्याने मी दु:खी आहे. हा कपड्यांचा नाही तर चित्रपटांचा उत्सव आहे हे अनेक वेळा लोक विसरतात.असं बरचं काही सांगत तिने नेटकऱ्यांची कान उघडणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.