Vivek Agnihotri On Salaar: 'एकदम भंगार...' विवेक अग्निहोत्रींना 'सालार' काही पटेना!

Vivek Agnihotri On Salaar:
Vivek Agnihotri On Salaar:Esakal
Updated on

Vivek Agnihotri On Salaar: आदिपूरुषनं प्रेक्षकांची खुपच निराशा केली. तर देखील प्रभासच्या चाहत्यांची त्याच्या बद्दलची क्रेझ काही कमी झाली नाही. ते प्रभासच्या सालारची आतुरतेने प्रतिक्षा करत आहेत. दरम्यान काल सालारचा टिझर रिलिज झाला आणि चाहत्यांनी एकच जल्लोष केला. KGF आणि KGF 2 चे दिग्दर्शक प्रशांत नील यांनीच सालारचे दिग्दर्शन केले आहे.

टिझर समोर आल्यानंतर प्रेक्षकांनी या चित्रपटाच्या टिझरला समिंश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. काहींनी या चित्रपटाला सुपरहिट सांगितले की त्याला केजीएफची स्वस्त कॉपी म्हटलं आहे.

त्यातच आता काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. प्रभासच्या सालारचं नाव न घेता अग्निहोत्री यांनी या चित्रपटावर कडाडून टिका केली आहे.

त्यांनी एकापाठोपाठ एक ट्विट केले आहेत, जे व्हायरल होत आहेत. त्यात त्यांनी आपल्या ट्विटमध्ये 'मिशन इम्पॉसिबल: डेड रेकनिंग' या हॉलिवूड चित्रपटाचेही कौतुक केले.

Vivek Agnihotri On Salaar:
Britney Spears: पॉप सिंगर ब्रिटनी स्पीयर्सने केली प्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडू विरोधात तक्रार दाखल! काय आहे प्रकरण..

मात्र, विवेकने आपल्या ट्विटमध्ये कोणत्याही चित्रपटाचे नाव घेतलेले नाही. पण 'सालार'लाच टोमणा मारत असल्याचा दावा नेटकऱ्यांनी केला आहे.

एका यूजरच्या ट्विटला उत्तर देताना त्यांनी लिहिले की, 'लोक जन्मजात हिंसक नसतात. तुमच्या मुलांच्या डोक्यात इंडस्ट्रीच्या नेत्यांकडून लोकप्रिय साहित्य, सिनेमा आणि राजनितील हिंसेला ग्लॅमरस करुन तयार केलं जाते. ज्यांना वास्तविकरित्या तरुणांच्या मनांला शांती मिळविण्यासाठी प्रेरित करायला हवे. अशा हिंसक जगात क्रिएटिव्ह कॉन्शियस हा एकमेव उपाय आहे.

Vivek Agnihotri On Salaar:
Mirzapur 3: मिर्झापूरमध्ये दद्दा त्यागीच्या पोराची पुन्हा एन्ट्री! दिली मोठी हिंट, चाहत्यांची उत्सूकता वाढली

दुसर्‍या ट्विटमध्ये अग्नीहोत्री यांनी लिहिले की, 'आम्ही उत्कृष्ट अभियांत्रिकी आणि दमदार कथाचा वापर करुन असे भव्य चित्रपट बनवले आहेत. उदाहरणार्थ, शोले. पण आता प्रेक्षकांना मूर्ख बनवणे, मार्केटिंग हाईप आणि मोठ्या आवाजात लाऊड ​​अॅक्शन करून चित्रपट हिट होऊ शकतो, असा विश्वास सगळ्यांनाच वाटत आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर पाहता हेही खरे आहे.

तर दुसरीकडे हॉलिवूडच्या स्टार टॉम क्रूझच्या आगामी 'मिशन इम्पॉसिबल: डेड रेकनिंग' या चित्रपटाचे कौतुक करताना विवेकने लिहिले, 'Experiment. Innovation. Engineering. Execution. असाधारण अ‍ॅक्शन सिनेमाची दुनिया 'मिशन फिल्म'. मला आशा आहे की एखाद्या दिवशी फक्त स्टार इमेज तयार करण्याऐवजी आपण असं काहीतरी तयार करू.

Vivek Agnihotri On Salaar:
Ketan Mehta: दिग्दर्शक कंगनावर भडकला म्हणाला, 'ती चोरटी तिनं...'

'सलार पार्ट 1 - सीझफायर' यात पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन, टिन्नू आनंद, जगपती बाबू आणि ईश्वरी राव असे अनेक स्टार्स आहेत. हा तेलगू चित्रपट हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 28 सप्टेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()