Vivek Agnihotri On Pathaan: 'बॉयकॉट गँगमुळेच पठाण यशस्वी', विवेक अग्नीहोत्रीनं शाहरुखचं कौतुक केलं की...

पठाण मधल्या पहिल्या गाण्याला आधी विरोध सुरू केला. मात्र, आता विवेक अग्निहोत्रीचा सूर बदलेला दिसतोय.
Vivek Agnihotri On Pathaan
Vivek Agnihotri On PathaanEsakal
Updated on

'द काश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे सोशल मीडियावर आपल्या बेताल वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असतात. ते अनेक मुद्यावर त्याचं मतं मांडतात आणि त्यानंतर बरेच वाद होतात. असचं काहीसं यावेळी झालं. त्याने पठाण मधल्या पहिल्या गाण्याला आधी विरोध सुरू केला. मात्र, आता विवेक अग्निहोत्रीचा सूर बदलेला दिसतोय. पठाणच्या यशाबद्दल बोलताना त्यानं शाहरुख खानचं कौतुक केलं.

'पठाण'ची रेकॉर्डब्रेक कमाई सुरू आहे. 'पठाण' रिलीजच्या दोन आठवड्यात ब्लॉकबस्टर ठरला आहे. बॉलीवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या 'पठाण' रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. याबद्दल जेव्हा विवेक अग्निहोत्रीला विचारण्यात आलं तेव्हा तो बोलत होता.

Vivek Agnihotri On Pathaan
Vivek Agnihotri : मोदींमुळेच मला बॉलीवूडमध्ये....अग्निहोत्रींचा मोठा गौप्यस्फोट!

यावेळी विवेक अग्निहोत्री यांनी शाहरुख खानचंही कौतुक केलयं, तो म्हणतो की, “पठाण केवळ शाहरुखच्या स्टारडममुळे आणि फॅन फॉलोइंगमुळे हिट झाला. ज्या प्रकारे त्याने चित्रपटाचे मार्केटिंग केलं आणि संपूर्ण चित्रपट माझा चित्रपट आहे आणि त्याला मी जबाबदार आहे."

'हा चित्रपट हिट होण्याचे श्रेय शाहरुख खान व्यतिरिक्त बॉयकॉट गँगला जाते. चित्रपटाला विरोध करण्याचा बॉयकॉट टोळीचा डाव फसला आणि त्याचा फायदा ‘पठाण’ला झाला. तो म्हणाला की, 'काही श्रेय त्या लोकांनाही जातं ज्यांनी या चित्रपटाबाबत मूर्खपणाची वक्तव्ये केली आहेत. लोकांनी विनाकारण विरोध केला आणि बहिष्काराची चर्चा केली.'

Vivek Agnihotri On Pathaan
Dilip Joshi On Dayaben: 'दया आय मिस यू', व्हॅलेंटाईन डे निमित्तानं जेठालालनं व्यक्त केली भावना..

पठाण चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यावरून बराच गदारोळ झाला होता. अनेकांनी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणीही केली होती. त्यादरम्यान विवेक अग्निहोत्री यांनीही या गाण्यावर अश्लीलता पसरवल्याचा आरोप केला होता.

Vivek Agnihotri On Pathaan
Ashutosh Gowariker Birthday: बॉलीवूडच्या दिग्दर्शकांना जशास तसं उत्तर देणारा 'मराठमोळा दिग्दर्शक'!

शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम स्टारर 'पठाण' हा बॉलिवूडच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. आतापर्यंत 'पठाण'ने कलेक्शनच्या बाबतीत भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक मोठे चित्रपट मागे टाकले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.