Waheeda Rehman & Raj Kapoor Memory: ७० चं दशक बॉलीवूड सिनेमांनी गाजवला..तो सुवर्णकाळच वेगळा होता. त्या काळातील सिनेमांची आणि कलाकारांची गोष्टच वेगळी होती. त्यावेळचे अनेक किस्से ऐकणं चाहत्यांना आवडतं. अनेक कलाकारही आपल्या शूटिंगच्या दिवसांना आठवतात आणि अनेक किस्से शेअर करताना दिसतात.
काही दिवसांपूर्वी वहिदा रहमान या अरबाज खानचा पॉप्युलर चॅट शो The Invincibles मध्ये सहभागी झाल्या होत्या. यादरम्यान त्यांनी अनेक किस्से शेअर केले. एक किस्सा असाही होता की जेव्हा वहीदा रहमान आपल्या सिनेमाच्या कास्ट सोबत ट्रॅव्हल करत होत्या आणि चाहत्यांनी त्यांना घेरलं होतं त्यादरम्यान राज कपूर भलतेच संतापले होते.
नेमकं काय झालं होतं चला जाणून घेऊया सविस्तर.(Waheeda Rehman dangerous encounter fans teesri kasam shoot raj kapoor wild incident)
तो किस्सा शेअर करताना वहीदा रहमान म्हणाल्या-''त्या शहरात खूप कॉलेजेस होते. त्याकाळात ट्रेन हा उत्तम पर्याय असायचा प्रवासासाठी..त्यानेच आम्ही लांबचा प्रवास करायचो. एका कम्पार्टमेंटमध्ये राज कपूर आणि त्यांचे मित्र होते. तर दुसऱ्या कम्पार्टमेंटमध्ये मी,माझी बहिण आणि माझी हेअर ड्रेसर होती''.
''गाडी सुरू झाली आणि लगेच थांबली. पडदा थोडा बाजूला सारून आम्ही आडून पाहत होतो नेमकं काय झालं ते जाणून घेण्यासाठी. खूप पब्लिक जमा झालं होतं. त्यातल्या एका मुलानं म्हटलं की राज कपूरना भेटायचं आहे. तुमच्या लोकांनी खूप तंगवलं आम्हाला. आता आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे''.
''राज कपूर त्यानंतर चाहत्यांना भेटले. पण त्यानंतर गोष्टी जरा बिघडल्या''.
वहीदा रहमाननी पुढचा किस्सा शेअर करत म्हटलं की-''त्यानंतर लोकांनी राज कपूर यांच्याकडे डिमांड केली की त्यांना मला भेटायचं आहे. पण राज कपूर यांनी त्या गोष्टीस साफ नकार दिला. त्यानंतर मी राज कपूर यांना विनंती केली की मला भेटू दे लोकांना. पण राज कपूर माझं ऐकले नाहीत''.
त्यांनी म्हटलं,''नको हे तुझ्यासाठी सुरक्षित नसेल. खेचून घेऊन गेले तर. मी म्हटलं कसं खेचून घेऊन जातील. तेव्हा तिथे उपस्थित राहिलेल्या मुलांना इतका राग आला की त्यांनी दगडफेक सुरू केली. बस्स..याच गोष्टीवर राज कपूर भडकले''.
''एक तर ते इतके गोरे होते..की राग आल्यानं लाल लाल झाले अगदी टोमॅटोसारखे. मी घाबरले..मला वाटलं रागानं यांना हार्ट अटॅक वगैरे यायचा. आम्ही तिघींनी त्यांना कसंबसं समजावलं..आणि त्यांचा राग कमी करण्याचा प्रयत्न करू लागलो''.
'तिसरी कसम' सिनेमाविषयी बोलायला गेलं तर हा सिनेमा राज कपूर यांचा सर्वात मोठा सिनेमा होता. याची गाणी देखील खूप प्रसिद्ध झाली होती. सिनेमाचं दिग्दर्शन बसू भट्टाचार्य यांनी केलं होतं. तर निर्मिती शैलेंद्र यांची होती.
अभिनेत्री वहीदा रहमान विषयी बोलायचं झालं तर त्या आता ८५ वर्षाच्या झाल्या आहेत. आता त्या सिनेमात जरी दिसत नसल्या तरी अनेकदा पुरस्कार सोहळ्यात किंवा जाहिरातींचा भाग झालेल्या त्या नजरेस पडतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.