95व्या ऑस्कर पुरस्काराची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. यंदाच्या या ऑस्कर सोहळ्यावर सर्वच भारतियांच्या नजरा खिळल्या आहेत. त्याचे कारण देखील विशेष आहे. कारण यावेळी आरआरआर हा चित्रपट ऑस्करमध्ये भारताचा डंका वाजवण्यासाठी सज्ज आहे.
ऑस्करचा सन्मान हा कलाक्षेत्रातील सर्वात मोठा सन्मान मानला जातो. हा पुरस्कार मिळवण्याची संधी कोणीही सोडू इच्छित नाही. कलाकारला एकदाही हा पुरस्कार मिळाला तर त्याची कारकीर्द यशस्वी होते असं म्हटलं जातं आणि ते खरंही आहे. भारतातील अनेक कलाकारांना जरी ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत, परंतु भारताला आजपर्यंत एकही ऑस्कर पुरस्कार मिळालेला नाही .
एकीकडे भारतासारख्या मोठ्या देशाला एकही ऑस्कर नाही, मात्र दुसरीकडे अशी व्यक्ती आहे ज्याने एकट्याने २० हून अधिक ऑस्कर पुरस्कारावर आपलं नावं कोरलं आहे. तो आहे महान अॅनिमेशन चित्रपट निर्माता वॉल्ट डिस्ने.
वॉल्ट डिस्ने हा अॅनिमेशन जगताचा बादशाह मानला जातो. त्यांने आपल्या व्यंगचित्रातून सर्वांचेच भरपूर मनोरंजन केले. 6 वेगवेगळ्या श्रेणींसाठी नामांकन मिळालेले ते जगातील पहिले व्यक्ती होते.
वॉल्ट डिस्ने यांनी त्याच्या कारकिर्दीत असे प्रशंसनीय काम केले की त्यांना एकूण 59 नामांकन मिळाले आहेत. त्यापैकी त्यानी 22 जिंकले. याशिवाय त्यांना 4 मानाचे पुरस्कारही मिळाले. या दृष्टिकोनातून, वॉल्ट डिस्नेला त्याच्या कारकिर्दीत एकूण 26 ऑस्कर पुरस्कार मिळाले, जो एक जागतिक विक्रम आहे.
वॉल्ट डिस्ने यांच्या बद्दल सांगायचं झालं तर ते अपील टू रिजन नावाच्या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर रायन वॉकर यांनी रेखाटलेल चित्र कॉपी करत असत. त्यांना व्यंगचित्राची खुप आवड होती. यामुळे त्यांच्या आभ्यासावरही परिणाम व्हायचा. त्यांनी अभ्यासासोबतच 6 वर्षे व्यंगचित्राच्या विविध प्रकारांचे प्रशिक्षण घेतलं. या दरम्यान त्याच्या ग्रेडवरही वाईट परिणाम झाला. पण व्यंगचित्रकलेविषयी त्यांनी नेहमीच आपली आवड आणि कला जोपासली.
टॉम अँड जेरी हे जगातील सर्वात लोकप्रिय कॉमेडी कार्टून शो देण्याचं श्रेय वॉल्ट डिस्नेला जातं. या शोला जगभरात लोकप्रियता मिळाली. आधी त्याचे नाव मॉर्टिमर माऊस होते पण डिस्नेच्या पत्नीने मिकी हे नाव सुचवले आणि नंतर हे नाव अजरामर झाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.