Web Series: 2021 साली उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार सापडलेली तेव्हा संपूर्ण देशात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. या केसमध्ये साक्षीदार बनलेल्या मनसुख हिरन यांची देखील हत्त्या करण्यात आली.
आणि या प्रकरणात पोलिस अधिकारी सचिन वझेना आरोपी बनवलं गेलं. या घटनेशी संबंधित एक पुस्तक लिहिलं गेलं होतं 'सी आय यू: क्रिमिनल्स इन यूनिफॉर्म'. आता या पुस्तकावर एक वेबसिरीज येत आहे.(CIU Criminals In Uniform book wiil soon be adapted in web series)
हे पुस्तक पत्रकार संजय सिंग आणि राकेश त्रिवेदी यांनी लिहिलं होतं. खास गोष्ट ही आहे की संजय सिंग यांचे हे तिसरे पुस्तक आहे ज्याच्यावर वेब सिरीज बनवली जात आहे. त्यांचे पहिले पुस्तक 'स्कॅम २००३: द तेलगी स्टोरी' वर देखील वेब सीरिज बनवली जात आहे,ज्याला सोनी लाइव्ह वर रिलीज केलं जाईल.
याव्यतिरिक्त त्यांचे आणखी एक पुस्तक 'एक थी हसीना बोरा' वर देखील वेब सीरिजची निर्मिती केली जात आहे.
अमिताभ बच्चन आणि अजय देवगण अभिनित 'रनवे ३४' आणि विद्युत जामवालच्या 'खुदा हाफिज चॅप्टर २' ची सहनिर्मितीची जबाबदारी पेललेल्या बॉम्बे स्टेंसिल्सनं 'सीआययू: क्रिमिनिल्स इन युनिफॉर्म' पुस्तकावर वेब सिरीज बनवायचं निश्चित केलं आहे.
यासाठी निर्माते लीडींग ओटीटी प्लॅटफॉर्मशी बातचीत करत आहेत. अर्थात कथा काल्पनिक असेल असं आता तरी म्हटलं जात आहे.
वेब सीरिजचे निर्माते हसनैन हुसैनी आणि दुष्यंत सिंग या वेबसीरिजला दिग्दर्शित करण्यासाठी एका उत्तम दिग्दर्शकाचा शोध घेत आहेत. वेब सीरिजच्या निर्मात्यांनी म्हटलं आहे की,''या कथेत दमदार सस्पेंन्स,ट्विस्ट अॅन्ड टर्न्स आणि शानदार क्लायमॅक्स पहायला मिळेल''.
''लेखकांच्या पत्रकारितेतील अनुभवानं यामध्ये चांगलाच कन्टेंट दिला आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की या पुस्तकातील कथेत वेब सीरिज बनण्याची ताकद आहे. आम्ही या प्रोजेक्टला सुरू करण्यासाठी उत्सुक आहोत. आणि ओटीटीसाठी शानदार शो बनवण्याच्या तयारीत आहोत''.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.