मुंबई - तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय मालिका म्हणून द अॅस्पिरंट्सचे (web series tvf aspirants ) नाव घेता येईल. फार कमी वेळेत या मालिकेनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले. लक्षवेधी कथानक, प्रभावी मांडणी, मनात घर करणारा अभिनय, सुंदर संवाद यांच्यामुळे ही मालिका सर्वांची आवडती झाली होती. मात्र त्या मालिकेवर चोरीचा आरोप लावण्यात आला आहे. निर्मात्यांनी ही कथा दुस-या एका लेखकाची चोरली असल्याचे त्यात म्हटले आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आता सीरिजच्या निर्माते आणि दिग्दर्शक यांना कायदेशीर कारवाईला सामोरं जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (web series tvf aspirants makers accused of stealing the story this legal trouble)
गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून सोशल मीडियावर द अॅस्पिरंट्सची (web series tvf aspirants ) मोठ्या प्रमाणात चर्चा होती. या मालिकेचा चाहतावर्ग कमालीच्या वेगानं वाढला. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे तरुणाईच्या आवडीचा विषय त्यात हाताळण्यात आला होता. त्याची प्रभावी मांडणी करुन त्यांना आपलेसे करण्यात या मालिकेच्या निर्मात्यांना यश आले होते. आतापर्यत या मालिकेचे पाच भाग प्रदर्शित झाले आहेत. सहाव्या भागाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
टीव्हीएफच्या वतीनं या मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे. हिंदीतील लोकप्रिय युवा लेखक नीलोत्पल मृणाल यांनी निर्मात्यांवर चोरीचा आरोप केला आहे. त्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे. मृणाल यांचे म्हणणे आहे की, ज्या वेबसीरिजमध्ये जी गोष्ट सांगण्यात आली आहे ती माझी आहे. डीएनएनं सांगितल्यानुसार मृणाल यांनी फेसबुकवर एक मोठी पोस्ट लिहिली आहे त्यात त्यांनी त्यांच्या 2015 मध्ये आलेल्या डार्क हॉर्स (Dark Horse) नावाच्या पुस्तकाचा संदर्भ दिला आहे.
एवढेच नाही तर या पोस्टमध्ये नीलोत्पलनं लिहिलं आहे की, ते टीव्हीएफच्या अरुणाभ यांना भेटले होते. त्यावेळी त्यांना त्या कथेविषयी सांगितल्याचे मृणाल यांचे म्हणणे आहे. माझ्या डार्क हॉर्स नावाच्या पुस्तकावर मालिका तयार होईल असे आपण त्यांना त्यावेळई सुचविल्याचे मृणाल यांचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.