सध्या रणबीर(Ranbir Kapoor)-आलियाचं लग्न हा चर्चेचा विषय ठरला आहे. जेव्हापासून बातमी आलीय तेव्हापासून लग्नाची डेट,वेन्यू,मेन्यू,वेडिंग क्लोथ,सिक्युरिटी,फंक्शन डिटेल्स असे मोठमोठाल्या इंग्रजी शब्दांच्यामागच्या अपडेट्स कानावर पडत आहेत. पण दिवसागणिक यांच्यात बदल झालेले पहायला मिळत आहेत. आज तर सकाळी सकाळी बातमी आली की लग्नच पुढे ढकललं गेलं. बरं,नवीन तारिखही सांगितली नाही त्यामुळे चाहत्यांमध्ये नवा संभ्रम. आणि ही बातमी भट्ट कुटुंबानं दिल्यानं खरी ही वाटली ना राव. पण आता सकाळी लग्नाविषयी उलट-सुलट जो बोलला होता त्या आलियाच्या(Alia Bhatt) मोठ्या सावत्र भावाने म्हणजे राहुल भट्टने(Rahul Bhatt) सांगितलंय की,लग्न ठरलेल्या तारखेलाच होतंय पण लग्नस्थळ बदलू शकतं. आता हे काय राव. मस्त आर.के हाऊसमध्ये होणार होतं आधी,त्यानंतर रणबीरच्या बान्द्र्यातील वास्तु इमारतीत होणार होतं त्यानंतर आता बातमी येतेय यापैकी दोन्ही ठिकाणी नाही तर भलत्याच ठिकणी लग्न होत आहे. नेमकं कुठे? ते जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा.
आलियाचा सावत्र भाऊ राहूल भट्टनं आजच सकाळी म्हणजे १२ एप्रिलला सांगितलं होतं की,लग्न पुढे ढकललं, पण आता तो स्वतःच आपण असं बोललो हे कबूल करायला तयार नाही. तो म्हणाला,''हे लग्न या आठवड्यात होत आहे,पुढे ढकलण्यात आलेलं नाही. मी बोललेल्या वाक्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. मी कोणाकडेच लग्नाच्या निश्चित तारखेविषयी बोललेलो नाही. ते दोघेच याविषयी सांगतील. मी सांगणार नाही,पण लवकर होईल हे निश्चित. २० एप्रिल पूर्वी लग्न होणार हे निश्चित''.
राहुल भट्टनं लग्नाच्या वेन्यूला घेऊनही एक हिंट दिलीय. तो म्हणालाय,''घराभोवती गर्दी झाली लग्नामुळे तर तेथील रहिवाशांनादेखील अडचण होईल. म्हणून आता जिथे पहिलं फक्त रीसेप्शन होणार होतं,म्हणजे 'ताज' हॉटेलमध्ये तिथे आता लग्नही पार पडण्याची शक्यता आहे. कुलाबा येथील ताज हॉटेलमध्ये रणबीर-आलिया लग्न करतील असं राहूल भट्टनं सूचित केलंय. ज्यामुळे पापाराझींना आवरता येईल आणि सुरक्षेचाही प्रश्न सुटेल. प्रोटोकॉल आणि सर्व अरेंजमेंट्स फायनल झाल्या आहेत'' असंही त्यानं सांगितलं आहे.
आता आणखी एक बातमी आहे की,कपूर कुटुंबियांनी आणि आलिया-रणबीरनं राहूलला फोन स्विचऑफ करण्याती विनंती केली आहे. त्याच्यामुळे बरीच माहिती उगाचच बाहेत पोहोचतेय असं सगळ्यांना वाटत आहे. राहूल पुढे म्हणाला,आलिया-रणबीरच्या लग्नावर बोलायला मी योग्य व्यक्ती नाही. मला माझा फोन स्विचऑफ करून ठेवायला सांगितलं आहे. पण मी तसं करू शकत नाही कारण मी जीम ट्रेनर असल्याने माझेही क्लायंट आहेत ज्यांचे फोन मला सारखे येत असतात. माझ्याकडून कोणीच आतली बातमी काढून घेऊ शकत नाही. मी ३० तास डेव्हिड हेडलेच्या केसमध्ये चौकशीसाठी आत होतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.