Welcome 3: अक्षय कुमारच्या आगामी वेलकम 3 चं शुटींग थांबलं, पैशांच्या कारणावरुन मोठा वाद

या मोठ्या कारणामुळे वेलकम 3 चं शुटींग थांबलं
Welcome 3 shoot stop FWICE says it 'won't allow' as Firoz Nadiadwala hasn't paid Rs 2 crore dues
Welcome 3 shoot stop FWICE says it 'won't allow' as Firoz Nadiadwala hasn't paid Rs 2 crore dues SAKAL
Updated on

Welcome 3 News: फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज म्हणजेच FWICE ने व्हायकॉम 18 च्या सीईओ ज्योती देशपांडे आणि 'वेलकम 3' चित्रपटाचे कलाकार आणि तंत्रज्ञ यांना आवाहन केले आहे.

चित्रपट निर्माते अनीस बज्मी यांची थकबाकी भरण्यासाठी फिरोज नाडियादवाला यांच्यावर कारवाई करावी,असे यात सांगितले आहे. फिरोज यांनी अनीस यांना दिलेला चेक बाऊन्स झालाय. मात्र, तीन वर्षांपूर्वी FWICE ने फिरोज नाडियादवाला यांच्याविरोधात असहकार पत्र जारी केले होते.

(Welcome 3 shoot stop FWICE says it 'won't allow' as Firoz Nadiadwala hasn't paid Rs 2 crore dues)

Welcome 3 shoot stop FWICE says it 'won't allow' as Firoz Nadiadwala hasn't paid Rs 2 crore dues
Jawan: शाहरुख खानच्या जवानमधील 'ती' गोष्ट गोरखपूरमधील सत्य घटनेवर आधारीत, वाचा सविस्तर

एवढेच नाही तर FWICE ने अक्षय कुमार आणि दिशा पटानी सारख्या वेलकम 3 च्या सर्व कलाकारांना या चित्रपटाचे शूटिंग न करण्यास सांगितले आहे. जोपर्यंत फिरोज नाडियाडवाला वेलकम 2 च्या तंत्रज्ञांचे सर्व पैसे देत ​​नाहीत, तोपर्यंत कोणीही शुटींग करु नये असे सांगण्यात आलंय.

FWICE सरचिटणीस अशोक दुबे यांनी 'नवभारत टाइम्स.कॉम'शी संवाद साधला. यावेळी त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.

अशोक दुबे म्हणाले, 2015 सालची गोष्ट आहे. जेव्हा अनीस बज्मी दिग्दर्शक होते. त्यांचे ४-५ कोटी रुपये फिरोज नाडियादवाला यांच्याकडे शिल्लक होते. त्यांनी महासंघाकडे तक्रार केली. त्यानंतर तेथून फिरोज नाडियादवाला यांच्याशी चर्चा झाली. दोन कोटींचा तोडगा निघाला. तर तो म्हणाला आमचा चित्रपट आधी प्रदर्शित होऊ द्या. हे दोन कोटी रुपये आम्ही तुम्हाला नंतर देऊ. त्यांनी प्रत्येकी एक कोटी रुपयांचे दोन धनादेश दिले. चित्रपट रिलीज झाल्यानंतर फेडरेशनने ते जमा केल्यावर त्यांनी स्टॉक पेमेंट केले. तसेच कॅमेरामन आणि मेकअप आर्टिस्टचे 40 ते 50 लाख रुपये थकबाकी असेल. ही एकुण रक्कम अडीच कोटी रुपये असेल. फेडरेशनला वारंवार पत्र देऊनही नाडियादवाला यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे फेडरेशनने यांना आमची माणसे कोणत्याही चित्रपटात काम करणार नाही, असा असहकार दिला. 8 वर्षे झाली असून अद्यापही त्यांनी पैसे काढलेले नाहीत.

अशोक दुबे पुढे म्हणाले, "चेक बाऊन्स झाल्याचा खटला गेल्या 6 वर्षांपासून अंधेरी कोर्टात सुरू आहे. मेकअप आर्टिस्टना सुमारे 3 लाख रुपये, कॅमेरामनला 1 लाख 50 लाख रुपये आणि तीन कलाकारांना 4.5 लाख रुपये मानधन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आणि फेडरेशनच्या नावाने दिलेला चेक बाऊन्स झाला आहे."

त्यामुळे या सर्व प्रकरणात वेलकम 3 च्या शुटींगला ब्रेक लागला असुन कलाकार कोणती भुमिका घेतात हे पाहणं कुतुहलाचा विषय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.