गेल्या दोन वर्षांपासून कोरोनानं संबंध जगाला ठप्प करून ठेवलं होतं. सगळेच व्यवहार बिघडले होते. आणि हा परिणाम सगळयाच स्तरावर झाला होता. त्यातलंच एक महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे मनोरंजन क्षेत्र. ऑक्टोबरमध्ये पुन्हा नाट्यगृह,सिनेमागृह खुली झाली आणि मनोरंजन क्षेत्रात आनंदाचं वातावरण पसरलं. ओटीटी माध्यमाचा पर्याय ज्यांना नको होता अशा सिनेमांनी लगोलग सिनेमागृहात आपले सिनेमे लावायला सुरुवात केली. मराठीत 'झिम्मा' आणि 'पांडू' सिनेमा तर हिंदीत सलमान खानचा 'अंतिम-द फायनल ट्रुथ' प्रदर्शित करण्यात आले.
कोरोना काळानंतर पुन्हा झी स्टुडिओचीच निर्मिती असलेला 'झिम्मा' सिनेमा पहिल्यांदा प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी हाऊसफुल्लचा बोर्ड थिएटरबाहेर झळकला. या आठवड्यातही 'झिम्मा' यशस्वी ठरतोय. सलमानचा 'अंतिम- द फायनल ट्रुथ' प्रदर्शित होऊनही झिम्मावर काही परिणाम झाल्याचं दिसून आलं नाही. आता पुन्हा 3 डिसेंबरला झी स्टुडिओचाच 'पांडू' सिनेमा प्रदर्शित होतोय. सोनाली कुलकर्णी,भाऊ कदम,कुशल बद्रिके अशी स्टारकास्ट या सिनेमात दिसणार आहे. सिनेमा प्रदर्शित होण्याआधीपासूनच त्याची गाणी लोकांना थिरकायला लावतायत. ज्येष्ठ दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांना या सिनेमाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. 'पांडू' सिनेमातलं केळेवाली गाणं नक्की पहा.
या सिनेमातलं 'बुरुम बुरुम','केळेवाली','दादा परत या ना' ह्या गाण्यांनी तर 35 लाखांच्या वर व्ह्युज मिळवले आहेत. या सिनेमात भाऊ आणि सोनालीची केमिस्ट्री तुफान पसंत केली जातेय. सिनेमाची टीमही प्रमोशनमध्ये कुठेच मागे राहत नाही. नुकतंच या सिनेमाचा प्रिमियर सोहळा पुण्यात कोथरुड येथील सिनेप्राइड मध्ये पार पडला. यावेळी थिएटरने प्रिमियर सोहळ्याला आलेल्या लोकांपासून पांडू सिनेमाच्या कलाकारांनाही एक गोड सरप्राइज दिलं. त्याचं झालं असं की थिएटरमध्ये फक्त 50 टक्के क्षमतेनंच लोकांना बसवलं जातं. पण मग बाजूची खूर्ची रिकामी राहते आणि लोकांना सिनेमा पाहायला आल्याचं फील येत नाही.
म्हणूनच पुण्यातील कोथरुड य़ेथील सिटी प्राइड सिनेमानं रिकाम्या खुर्च्यांमध्ये कलाकारांचे कटआऊट्स लावून ती कमी भरून काढली. संपूर्ण थिएटर त्यामुळे लोकांनीच भरल्यासारखं वाटलं होतं. प्रिमिअरला गेलेले कलाकारही या गोड सरप्राइजने आश्चर्यचकित झाले. इथे प्रत्येक रिकाम्या खुर्चीत पांडू सिनेमातील कलाकार सोनाली कुलकर्णी,कुशल बद्रिके,भाऊ कदम यांचे कटआऊट्स लावल्यामुळे थिएटरही अगदी कलरफुल दिसत होतं. हिंदीला बॉक्सऑफिस धमाक्याचा सुर गवसला नसला तरी मराठीनं मात्र आपलं खातं दणदणीत खोललंय असं म्हणावं लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.