असं आहे आदर पुनावालांचं मलायका, करिनासोबतचं कनेक्शन

पाहा हे खास फोटो
Adar Poonawalla, Malaika Arora and Kareena Kapoor Khan
Adar Poonawalla, Malaika Arora and Kareena Kapoor Khan
Updated on

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया Serum Institute CEO या लसनिर्मिती संस्थेचे प्रमुख आदर पुनावाला Adar Poonawalla हे सध्या खूपच चर्चेत आहेत. काही महिन्यांपूर्वीच जगातील सर्वांत मोठे लस उत्पादक म्हणून वर्षातील सहा महत्त्वाच्या आशियाई व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला. त्यांना 'एशियन ऑफ दी इयर' घोषित करण्यात आलं होतं. पण तुम्हाला माहित आहे का, आदर पुनावाला आणि करीना कपूर Kareena Kapoor, मलायका अरोरा Malaika Arora यांसारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींचं काय कनेक्शन आहे? (What is Malaika Arora and Kareena Kapoor connection with Serum Institute CEO Adar Poonawalla)

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खानच्या काही खास मैत्रिणी आहेत. यामध्ये बहीण करिश्मा कपूर, अमृता अरोरा, मलायका अरोरा, करण जोहर, मल्लिका भट्ट आणि नताशा पुनावाला यांचा समावेश आहे. नताशा पुनावाला ही आदर यांची पत्नी आहे. भारतात 'कोव्हिशिल्ड' या लशीच्या निर्मितीसाठी परवानगी मिळाल्यापासून आदर पुनावाला हे चर्चेत आहेत.

हेही वाचा : अक्षय कुमारवर मदतीचा दिखाऊपणा करण्याचा आरोप; ट्विंकलचं सडेतोड उत्तर

नताशा ही सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कार्यकारी संचालक आणि विल्लू पुनावाला फाऊंडेशनची अध्यक्षा आहे. त्याचप्रमाणे ती करिना कपूरची खास मैत्रीणसुद्धा आहे. करीना आणि मलायका हे नेहमीच नताशा आणि आदर यांच्यासोबत पार्टी करताना किंवा सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसतात. सैफ अली खान, अमृता अरोरा आणि करिश्मा कपूर यांनासुद्धा त्यांच्यासोबत अनेकदा पाहिलं गेलंय. नताशाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रिटींसोबतचे फोटो पाहायला मिळतात. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा आणि निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांचीसुद्धा नताशासोबत चांगली मैत्री आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()