Bigg Boss Marathi 3: जाणून घ्या, विशाल निकम जिंकलेल्या रकमेचं काय करणार?

विशालला बिग बॉसची ट्रॉफी आणि २० लाख रुपयांचा धनादेश मिळाला.
Vishal Nikam, Winner of Big Boss Marathi 3
Vishal Nikam, Winner of Big Boss Marathi 3Colours Marathi
Updated on

सांगलीचा विशाल निकम (Vishal Nikam) हा 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi 3) या लोकप्रिय शोच्या तिसऱ्या सिझनचा विजेता ठरला. विशालला बिग बॉसची ट्रॉफी आणि २० लाख रुपयांचा धनादेश मिळाला. जिंकलेल्या या रकमेचं काय करणार याबद्दल विशालने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. त्याचप्रमाणे बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतरच्या भावना त्याने व्यक्त केल्या. गेल्या १०० दिवसांपासून सुरू असलेल्या या कार्यक्रमावर रविवारी अखेरचा पडदा पडला. या पर्वाचा उपविजेता जय दुधाणे ठरला.

'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत विशाल म्हणाला, 'मी माझा आनंद व्यक्त करू शकत नाहीये. बिग बॉस मराठीच्या टीमने मला जेव्हा ऑफर दिली होती, तेव्हा मला आश्चर्याचा मोठा धक्का बसला होता. बिग बॉसच्या घरात जाण्याचं माझं स्वप्न होतं आणि ते सत्यात उतरलं. बिग बॉस हा रिअ‍ॅलिटी शो आहे आणि तो माझ्यासारख्या रिअल लोकांसाठी आहे असं मला वाटतं. माझ्यासारख्या नव्या कलाकारावर प्रेक्षकांनी प्रेमाचा खूप वर्षाव केला. मी खूप खूश आहे.'

जिंकलेल्या रकमेचं काय करणार असा प्रश्न विचारला असता विशाल पुढे म्हणाला, 'मी अजूनही स्ट्रगल करतोय. मुंबईत माझं हक्काचं घर नाही. मी भाड्याच्या घरात राहतो. बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी मी पीजीमध्ये राहायचो. मी अजूनही लोकल ट्रेननेच प्रवास करतो. साधेपणात माझा विश्वास आहे. मी जिंकलेल्या रकमेचा वापर माझ्यासाठी करेन. माझ्या गावकऱ्यांसाठी आणि माझ्या प्रवासात साथ देणाऱ्यांसाठीसुद्धा मला काहीतरी करायचं आहे. माझ्यासारखा सामान्य माणूस हा शो जिंकू शकला, याचा मला खूप आनंद आहे.'

Vishal Nikam, Winner of Big Boss Marathi 3
बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यामुळे नाही तर 'या' कारणामुळे होतंय विशालचं कौतुक

कलर्स मराठी वाहिनीवर बिग बॉसचा यंदाचा तिसरा सिझन जोरदार गाजला होता. घरातील जोरदार भांडणं, नवनवीन टास्कने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं. या कार्यक्रमात १०० दिवसांच्या या खेळात मनोरंजन विश्वातील १५ कलाकारांनी सहभाग घेतला होता. त्यात आदिश वैद्य आणि निथा शेट्टी हे वाईल्ड कार्ड एण्ट्रीद्वारे सहभागी झाले होते. टॉप ५ स्पर्धकांमध्ये विशाल निकम, मीनल शाह, विकास पाटील, उत्कर्ष शिंदे आणि जय दुधाणे यांच्यामध्ये मोठी चुरस होती. यामध्ये विशाल निकमने बाजी मारली. अतिशय थाटामाटात हा महाअंतिम सोहळा पार पडला. सर्वचजण विशाल निकमवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.