Whats Love Got To Do With It Movie : बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर हे एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहे. त्यांच्या नावाचा डंका आता जगभर पसरला आहे. त्याचे कारण त्यांचा नवा कोरा चित्रपट. चित्रपट 'व्हॉट्स लव्ह गॉट टू डू विथ इट' शेखर कपूर यांच्या या चित्रपटानं प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. Whats Love Got To Do With It Movie Awards
कपूर यांच्या या चित्रपटानं जागतिक स्तरावर मोठी लोकप्रियता मिळवली आहे. सोशल मीडियावर कपूर यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. सध्या सगळीकडे एक चर्चा आहे दिग्दर्शक शेखर कपूर त्याच्या 1983 मध्ये आलेल्या ‘मासूम’ या पहिल्याच चित्रपटाच्या सिक्वेलवर काम करत आहे आणि त्याचे नाव ‘मासूम... द न्यू जनरेशन’ असे असणार आहे.
Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा
शेखर कपूर हे जागतिक ख्यातीचे दिग्दर्शक आहेत. ज्यांनी असंख्य सिनेमे करून नेहमीच प्रेक्षकांची मन जिंकली आणि प्रेक्षकांमध्ये कल्ट सिनेमाचा दर्जा मिळवला आहे. या दिग्दर्शक लेखकाचा सर्वात अलीकडील चित्रपट 'व्हॉट्स लव्ह गॉट टू डू विथ इट' संपूर्ण जगभरात जगभरात प्रदर्शित झाला. यूके, यूएसए आणि भारतात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला आणि जागतिक स्तरावर प्रचंड प्रतिसाद मिळाला.
या आठवड्याच्या सुरुवातीला ब्रिटीश राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी नामांकने जाहीर करण्यात आली आणि दिग्दर्शक शेखर कपूरच्या चित्रपटाला एक-दोन नव्हे तर तब्बल सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासह 9 नामांकने मिळाली. ही बाब नक्कीच अभिमानास्पद आहे.
चित्रपटसृष्टीतील कपूरच्या योगदानामुळे केवळ भारतात नाही तर जगभरात त्यांचं नाव झालं आहे. यांच्या एलिझाबेथ आणि एलिझाबेथ: द गोल्डन एज या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटांसह आंतरराष्ट्रीय स्तरावरही चित्रपटाचा बोलबाला आहे. मुख्य प्रवाहातील सिनेमाद्वारे शोध लागण्यापूर्वी त्यांनी केट ब्लँचेट, एडी रेडमायन आणि हेथ लेजर यांसारख्या अभिनेत्यांसह काम केले होते. अनोख्या चित्रपटाच्या दिग्दर्शना साठी शेखर कपूर ओळखले जातात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.