व्हॉट्स अ‍ॅप चॅटमुळे आर्यन खान अडकेल?

मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या त्या क्रुझ पार्टीमध्ये आर्यन खाननं जाणं त्यालाच महागात पडताना दिसत आहे.
व्हॉट्स अ‍ॅप चॅटमुळे आर्यन खान अडकेल?
Updated on

मुंबई - मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या त्या क्रुझ पार्टीमध्ये आर्यन खाननं जाणं त्यालाच महागात पडताना दिसत आहे. आज झालेल्या सुनावणीमध्ये सत्र न्यायालयानं त्याला जामीन देण्यास नकार दिला आहे. आता त्याला जामीनासाठी उच्च न्यायालयात जावं लागणार आहे. एनसीबीनं केलेल्या युक्तिवादाच्या जोरावर त्याला जामीन काही मिळाला नाही. याप्रकरणात आर्यन खानचं व्हाट्स अप चॅट हे महत्वाचे मानले गेले. एखाद्या प्रकरणामध्ये व्हाट्स अप चॅट एवढे प्रमाणभूत मानले जाते का, त्याची विश्वासार्हता कितपत असते, आर्यन खानला हे व्हाट्स अप चॅटची किती मोठी किंमत मोजावी लागणार हे येत्या दिवसांत कळणार आहे. याप्रकरणाची कायदेशीर बाजु आपण जाणून घेणार आहोत.

ज्येष्ठ वकील माजिद मेमन यांनी याप्रकरणाबाबत इ टाईम्सशी संवाद साधला. त्यात त्यांनी आर्यन खान आणि त्याच्याकडे सापडलेले व्हाट्स अॅप चॅट याविषयी सांगितले आहे. आर्यनला जामीन नाकारताना त्यानं केलेले व्हाट्स अप चॅट महत्वाचे मानले गेले आहे. त्यामुळे येत्या दिवसांत त्याच्या पुढील सुनावणीमध्ये देखील ते त्याला अडचणीची ठरेल अशी शक्यता वर्तवली जातेय. याविषयी ज्येष्ठ वकील माजिद मेमन यांनी सांगितले की, आर्यनला जामीन मिळेल. त्याला 17 दिवसांच्या अटकेनंतरही समजा त्याला जामीन मिळाला नाही तर आणखी वरच्या कोर्टाकडे अर्जही करता येईल. यावेळी मेमन यांनी आर्यनच्या व्हाट्स अॅपमुळे त्याची डोकेदुखी आणखी वाढेल का याविषयी सांगितलं आहे.

मेमन म्हणाले, व्हाट्स अॅपचा पुरावा याला फारसा काही आधार नाही. त्यामुळे वरिष्ठ न्यायालयामध्ये त्याला कितपत महत्व दिले जाईल याबाबत शंका आहे. तो पुरावा सब्सेंटिव्ह नाही. आर्यन हा हाय प्रोफाईल आहे. त्याचा परिणाम इतरांवर होईल. इतर पुरावे त्यामुळे नष्ट केले जातील. असाही युक्तिवाद करण्यात आला. मात्र या युक्तिवादाला फार महत्व देण्याची गरज नाही. त्याला कुठलही मेरिट नाही. यासगळ्यावर अरबाज मर्चंटचे वकील तारक सईद यांनी देखील सांगितलं होतं की, एनसीबीजवळ कोणताही भक्कम पुरावा नाही. ते जे काही सांगत आहे त्याला आधार केवळ व्हाट्स अप चॅट आहे.

व्हॉट्स अ‍ॅप चॅटमुळे आर्यन खान अडकेल?
आर्यन खान प्रकरणावर जावेद अख्तर यांचं कठोर भाष्य; म्हणाले...
व्हॉट्स अ‍ॅप चॅटमुळे आर्यन खान अडकेल?
किंग खानच्या आर्यनला जामीन नाकारला कारण...

ज्यावेळी घटनास्थळी पंचनामा झाला तेव्हा त्यावेळी आर्यनचा फोन जप्त करण्यात आल्याचा कोणताही उल्लेख नव्हता. त्यामुळे अचानक समोर आलेल्या या पुराव्यामुळे शंका उपस्थित झाली आहे. या प्रकरणामध्ये ड्रग्जची मात्रा 6 ग्रॅम होती असे सांगण्यात आले आहे. मात्र हे प्रमाण फारच कमी आहे. आणि त्याचा वापर हा वैयक्तिक कारणास्तव देखील केला जाऊ शकतो. ते कमर्शियल क्वांटिटीमध्ये येत नाही. असेही वकिलांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.