Aamir Khan: आमिर खान सध्या त्याच्या लाल सिंग चड्ढा(Laal Singh Chaddha) सिनेमामुळे भलताच चर्चेत आहे. सिनेमाच्या प्रमोशन मध्ये तो दिवस-रात्र मेहनत घेताना दिसत आहे. आमिर स्वतःच अनेक मुलाखतीतून आपण खूप तणावात आहोत,अस्वस्थ आहोत असं सांगत सुटला आहे. अर्थात सिनेमावरनं सुरू असलेल्या वादामुळे बॉक्सऑफिसवर फ्लॉपचा शिक्का बसतोय की काय हे मोठं टेन्शन त्यामागे आहे हे नव्यानं सांगायला नको. (When Aamir Khan's family failed to pay his school fees due to debt.)
आमिर म्हणाला एक अशी वेळ होती की त्याच्या कुटुंबावर कर्जाचा डोंगर झाला होता. त्यावेळी नेहमीच त्याची आणि त्याच्या भावा-बहिणींची शाळेची फी देण्यात उशीर व्हायचा. त्याच्या शाळेचे प्रिन्सिपल त्यावेळी शाळेची सामुदायिक प्रार्थना झाली की माईकवर आमिरचं नाव अनाऊन्स करायचे आणि एक दोन दिवसांत शाळेची फी भरुन टाकण्यासंदर्भात ताकिद दिली जायची. आणि हे असे अनेकवेळा झाल्याचं आमिर म्हणाला.
आमिर खान सिनेनिर्माता ताहिर हुसैन यांचा मुलगा आहे. आमिर त्याच्या भावा-बहिणीत सगळ्यात मोठा. त्याच्या व्यतिरिक्त फैजल खान,बहिण फरहत आणि निखत अशी तीन भावंड. एका मुलाखतीत आमिर खानने आपल्या लहानपणीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. त्यानं त्या वेळच्या आठवणींना उजाळा देत सांगितलं की ८ वर्षांपर्यंत त्याचं कुटुंब कर्जात बुडालेलं होतं. त्यावेळी आमिर खानच्या शाळेची फी इयत्ता सहावीत असताना ६ रुपये, सातवीत ७ रुपये आणि आठवीत ८ रुपये इतकी होती.
आमिर आणि त्याच्या भावा-बहिणींची फी शाळेत भरण्यास त्यावेळी खूप उशिर व्हायचा. शाळेत तेव्हा प्रार्थना झाल्यावर प्रिन्सिपल सर्व मुलांसमोर आमिरचं नाव जाहिरपणे बोलून दाखवायचे, आणि फी संदर्भात त्याला ताकिद दिली जायची. आमिर खान १९७३ मध्ये 'यादों की बारात' या सिनेमात बाल कलाकार म्हणून दिसला होता. त्यांनंतर त्याने मुख्य अभिनेता म्हणून १९८८ मध्ये 'कयामत से कयामत तक' या सिनेमात जुही चावला सोबत बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
आपल्या सगळ्यांनाच कदाचित हे माहित असेल की आमिर सिनेमे निवडताना खूप विचार करतो,तो चूझी आहे. आता तब्ब्ल ४ वर्षांनी आमिर मोठ्या पडद्यावर लाल सिंग चड्ढा सिनेमाच्या माध्यमातून पदार्पण करत आहे. हॉलीवूडच्या प्रसिद्ध 'फॉरेस्ट गम्प' या सिनेमाचा तो ऑफिशिअल रीमेक आहे. या सिनेमात आमिर खान सोबत करिना कपूर आणि नागा चैतन्य देखील दिसणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.