Amjad Khan यांनी शूटिंगच्या सेटवर हट्टानं बांधलेली म्हैस, कारणही होतं हटके

२७ जुलै,१९९२ रोजी अमजद खान यांनी जगाचा निरोप घेतला होता. गब्बर ही शोले सिनेमातील त्यांची व्यक्तिरेखा आजच्या पिढीतही प्रसिद्ध आहे.
When Amjad Khan did this act on the set after not getting tea, people were surprised to see 'Gabbar'
When Amjad Khan did this act on the set after not getting tea, people were surprised to see 'Gabbar'Esakal
Updated on

१२ नोव्हेंबर १९४० रोजी अमजद खान(Amjad Khan) यांचा जन्म मुंबईत झाला. अमजद खान यांचे वडील जयंत खान हे व्यवसायाने अभिनेता होते,तर त्यांचे भाऊ इम्तियाज खान देखील अभिनयक्षेत्रातच होते. खूप कमी जणांना कदाचित माहित असेल की अमजद खान यांनी बालकलाकार म्हणून सिनेमात डेब्यू केलं होतं. अमजद खान यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचे मन जिंकले होते. पण बोललं जातं की अमजद खान यांचे आयुष्यातले शेवटचे दिवस फार काही चांगले नव्हते. २७ जुलै,१९९२ रोजी अमजद खान यांनी जगाचा निरोप घेतला. चला आज त्यांच्या पुण्यतिथी(Death Anniversary) निमित्तानं काही खास गोष्टी जाणून घेऊया.(When Amjad Khan did this act on the set after not getting tea, people were surprised to see 'Gabbar')

When Amjad Khan did this act on the set after not getting tea, people were surprised to see 'Gabbar'
'जॅकलिनच्या तुलनेत कतरिनाच...'; सलमान खानला आली मिसेस कौशलची आठवण

१९५१ साली अमजद खान यांनी नाजनीज सिनेमातून बाल कलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. तर १७ व्या वर्षी त्यांनी १९७३ मध्ये आलेल्या हिंदुस्तान की कसम सिनेमातून चक्क हिरोची लीड भूमिका साकारली होती. याव्यतिरिक्त त्यांनी आणखी काही सिनेमांतून बाल कलाकाराच्या भूमिका साकारल्या आहेत. अमजद खान यांच्या सिने कारकिर्दित परवरिश,मुकद्दर का सिकंदर,लावारिस, हीरालाल-पन्नालाल, देशप्रेमी, नास्तिक, सत्ते पे सत्ता, चमेली की शादी, हम किसी से कम नही, रॉकी, लव्ह स्टोरी, कुर्बानी, नसीब, सुहाग, राम बलराम, सीता और गीता सारख्या हीट सिनेमांचा समावेश आहे. अमजद खान यांचे नाव त्या मोजक्या अभिनेत्यांमध्ये सामिल आहे ज्यांनी सिनेमात हिरो आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका तितक्याच ताकदीनं रंगवल्या.

When Amjad Khan did this act on the set after not getting tea, people were surprised to see 'Gabbar'
Ranveer वादात विवेक अग्निहोत्रींची उडी; म्हणाले,'हा मुर्खपणा...'

अमजद खान यांच्या बाबतीत बोललं जातं की ते चहाचे मोठे शौकीन होते. मीडियाच्या एका रिपोर्ट्सनुसार बोललं जातं की ते एका दिवसात ५० हून अधिक कप चहा प्यायचे. आणि अमजदच्या या त्रासदायक आवडीमुळे शूटिंगचा कॅंटिन स्टाफ देखील हैराण व्हायचा. कारण सगळं दूध एकट्यांच्या चहातच संपून जायचं. बोललं जातं की आपल्या चहाच्या या तलपला पूर्ण करण्यासाठी आणि दूधाची कमतरता भासू नये म्हणून एकदा अमजद खान यांनी शूटिंगच्या सेटवर एक म्हैस आणून बांधली होती.

When Amjad Khan did this act on the set after not getting tea, people were surprised to see 'Gabbar'
Ranveer चे न्यूड फोटो काढणारा फोटोग्राफर आला समोर, सांगितली 'अंदर की बात'

अमजद खान यांनी आपल्या सिनेकारकिर्दीत एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमे केलेत. त्यांच्या कितीतरी व्यक्तिरेखा,त्याचे गाजलेले संवाद आजही लोकांच्या स्मरणात फिट आहेत. गब्बर या शोले मधील त्यांच्या व्यक्तीरेखेने तर इतिहास रचलाय. आता इथे देखील सांगायचा मुद्दा हा की गब्बरच्या भूमिकेसाठी पहिली पसंत अमजद खान नव्हतेच मुळी. पहिली पसंत होते गब्बरसाठी डॅनी. पण त्यावेळी डॅनी यांचे धर्मात्मा सिनेमाचे शूटिंग सुरू होते. अशातच मग सलीम खान यांनी गब्बर साठी अमजद खान यांचे नाव सुचवले आणि बाकी पुढे घडला तो इतिहास आपण सर्वच जाणता.

When Amjad Khan did this act on the set after not getting tea, people were surprised to see 'Gabbar'
KWK 7: 'माझ्या बर्थ डे पार्टीत अनन्या आणि आदित्य...,मी पाहिलं',करणचा खुलासा

शोले सिनेमात अमजद खान यांनी रंगवलेला गब्बर पाहिला की वाटतं त्यानंतर आजपर्यंत कुठल्याच सिनेमात असा खलनायक पाहिला गेला नाही. माहितीच्या आधारे बोललं जातं की अमजद खान यांनी साकारलेला गब्बर त्यांच्या गावच्या धोबी पासून प्रेरित होता. शूटिंगच्या दरम्यान जेव्हा अमजद खान धोबीच्या स्टाईलमध्ये संवाद सुरु करायचे,तेव्हा सिनेमाचे दिग्दर्शक रमेश सिप्पींपासून पूर्ण युनिट हैराण होऊन जायचं. याच सिनेमाशी जोडलेला आणखी एक किस्सा अमजद खान यांचा आहे की सिनेमातील कितने आदमी थे हा संवाद परफेक्ट येण्यासाठी अभिनेत्याने ४० रीटेक घेतले होते.

When Amjad Khan did this act on the set after not getting tea, people were surprised to see 'Gabbar'
Bollywood v/s South: अखेर सलमाननं तोडली चुप्पी, भरोसा वाटत नाही म्हणाला...

अमजद खान यांना त्यांच्या अंतिम काळात वाढत्या वजनाचा भयानक त्रास झाला होता. त्याकारणाने त्यांचे चालणे,फिरणे अशक्य झाले होते. याचा दोष ते स्वतःलाच द्यायचे,एकदा एका मुलाखतीत यावर स्पष्ट बोलले देखील होते. एका शूटिंगच्या प्रवासात अमजद यांच्या गाडीला अपघात घडला,ज्यात अभिनेत्याला जबरदस्त मार बसला होता. त्यांच्या शरीरातील हाडं जवळपास तुटल्यात जमा होती. उपचारा दरम्यान अमजद खान कोमात गेले होते. पण त्यातूनही ते बरे झाले पण व्हीलचेअरवर त्यांना अवलंबून रहावं लागलं. पण यानंतर त्यांचे वजन इतक्या वेगाने वाढले की,एके दिवशी हार्टअटॅक येऊन त्यातच त्यांचे निधन झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.