Aamir Khan च्या 'या' सिनेमाचा करण जोहरनं घेतला होता धसका.. भारत सोडून थेट लंडनमध्ये बसला होता लपून..

करण जोहरनं 'एक था लडका' या आपल्या आत्मचरित्रामध्ये अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
Karan Johar, Aamir Khan
Karan Johar, Aamir KhanEsakal
Updated on

Karan Johar बॉलीवूडमधला सर्वात प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शकांपैकी एक आहे. अवघ्या २६ वर्ष वयात त्यानं 'कुछ कुछ होता है' सारखा ब्लॉकबस्टर सिनेमा दिला होता. पहिल्या सिनेमापासून करण जोहरनं दिग्दर्शनाच्या दुनियेत आपला ठसा उमटवला. आणि मग सगळीकडे करण जोहरचीच चर्चा होऊ लागली.

'कुछ कुछ होता है' नंतर करणचं आयुष्य बदललं असं म्हणायला हरकत नाही. या सिनेमानंतर करणला प्रोत्साहन मिळालं आणि त्यानं मग 'कभी खुशी कभी गम' सिनेमा बनवायचा प्लॅन केला. करणच्या या सिनेमानं देखील बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली.

हा करण जोहरचा दुसरा हिट सिनेमा होता. पण कदाचित खूप कमी लोकांना माहित असेल की 'कभी खुशी कभी गम सिनेमा]' वेळी तो भलताच टेन्शनमध्ये सापडला होता. एवढा चिंताग्रस्त होता की दिग्दर्शकानं टेन्शनमध्ये थेट लंडन गाठलं होतं. ही गोष्ट अनेकांसाठी शॉकिंग असेल,ज्याचा उल्लेख त्यानं आपलं पुस्तक 'एक अनोखा लडका' मध्ये केलं आहे. (When Karan Johar scared by aamir khan film lagaan success went london controversy)

Karan Johar, Aamir Khan
Janhvi Kapoor: बिजली गिराने मैं हूॅं आयी, कहते है मुझको...!

करणनं आपलं आत्मचरित्र 'एक अनोखा लडका' मध्ये 'K3G' वर भाष्य करताना म्हटलं होतं की 'कुछ कुछ होता है' सिनेमा त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला होता. या सिनेमानं त्याच्या आयुष्याला योग्य वळणावर आणलं. त्याच्याकडे पैसा,महागड्या गाड्या,घर आणि महागडी घड्याळं-कपडे सगळं आलं होतं. सिनेमा हिट झाला,तर त्याला 'कभी खुशी कभी गम' बनवण्याची प्रेरणा मिळाली.

अमिताभ बच्चन, शाहरुख खान,काजोल,करीना कपूर,जया बच्चन,हृतिक रोशन सोबत मिळून करण जोहरनं 'कभी खुशी कभी गम' सिनेमा बनवला. करणला आशा होती की त्याचा हा सिनेमा बॉक्सऑफिसवरचे सर्व रेकॉर्ड तोडेल आणि हिंदी सिनेमाला एका नव्या वळणावर घेऊन जाईल. पण त्याआधी आमिर खानचा 'लगान' सिनेमा रिलीज झाला. लगान व्यतिरिक्त त्याचवर्षी सनी देओलचा 'गदर' रिलीज झाला. 'लगान' आणि 'गदर' दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले. करण हैराण होता की यापद्धतीचे सिनेमे कसे हिट होऊ शकतात.

पुढे करणनं त्याच्या पुस्तकात म्हटलं आहे,''कभी खुशी कभी गम सिनेमाला समिक्षक निगेटिव्ह रिव्ह्यू देत होते. ज्यांनी खरंतर सिनेमा पाहून करणच्या तोंडावर सिनेमाची प्रशंसा केली होती तेच विरोधात लिहिताना दिसले. त्यामुळे करण सिनेमाला घेऊन खूप घाबरला होता. त्याला वाटत होतं की त्यानं हा सिनेमा बनवून आयुष्यात खूप मोठी चूक केली आहे''.

Karan Johar, Aamir Khan
Vaibhav Tatwawaadi: 'तू लग्न करच मग बघते..', वैभव तत्त्ववादीला धमकी

एकीकडे 'लगान'ची चर्चा रंगलेली तर दुसरीकडे करण 'कभी खुशी कभी गम' सिनेमा फ्लॉप होईल म्हणून घाबरला होता. पण असं झालं नाही. 'लगान' आणि 'गदर' चांगले चालले असतानाही करणच्या 'कभी खुशी कभी गम' सिनेमानं देखील लोकांचे मनसोक्त मनोरंजन केले.

पण जेव्हा पुरस्काराची वेळ आली तेव्हा 'लगान'ला ऑस्करसाठी नामांकन मिळालं. पुरस्कार सोहळ्यात 'लगान'चा गाजावाजा होता. करणला पुरस्कार सोहळ्यांपासून लांब ठेवलं जात होतं. याच गोष्टीमुळे चिंतेत सापडलेला करण सरळ लंडनला निघून गेला.

करण म्हणतो की त्याचा सिनेमा 'कभी खुशी कभी गम' भले ऑस्करपर्यंत पोहोचला नसेल पण बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसला. पण तरी कितीतरी दिवस या दुःखात राहिला की त्याच्या सिनेमाला पुरस्कार मिळाला नाही. मात्र काही वेळानंतर त्याला उमजलं की त्यानं चांगला सिनेमा बनवला आहे,ज्यानं लोकांचे मन जिंकले आहे.

Karan Johar, Aamir Khan
Salman Khan नं लग्नासाठी प्रपोज केलेल्या व्हायरल व्हिडीओवर अखेर जुही चावलानं दिलं स्पष्टिकरण;म्हणाली,'त्यावेळी खरंतर..'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.