कतरिना कैफचं(Katrina Kaif) नाव बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं. तिनं तिच्या करिअरमध्येही अनेक ब्लॉकबस्टर सिनेमातून काम केलं आहे. आणि आता विकी कौशलसोबत लग्न करुन ती मस्त आनंदात आपलं वैवाहिक आयुष्य जगत आहे. पण यामध्येच आता एक नवीन चर्चा तिच्याविषयी सुरू झाली आहे. ही गोष्ट आहे २०१९ सालातली म्हणजे कतरिनाच्या लग्नाआधीची आणि तिच्या प्रदर्शित झालेल्या 'भारत' सिनेमा दरम्यानची. तिनं त्या सिनेमाच्या प्रमोशनल कार्यक्रमात तिला झालेल्या आजाराविषयी सांगितलं होतं. ती त्यावेळी Anxiety आजारानं आपण कसे त्रस्त होतो,भीतीनं आपल्याला कसं ग्रासलं होतं याविषयी मोठा खुलासा केला होता. पण त्याचवेळी तिनं आपण यातून कसं बाहेर आलो याविषयी देखील सांगितलं होतं.(When Katrina Kaif talked about dealing with anxiety)
२०१९ सालात कतरिना कैफनं एका प्रतिथयश मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत आपल्याला झालेल्या Anxiety या आजाराविषयी भाष्य केलं होतं आणि या आजाराविषयी खूप स्पष्टपणे आपल्याआधी बोलली म्हणून आलिया भट्टचं कौतूक केलं होतं. आलिया भट्टनं या आजारावर जे भाष्य केलं होतं त्याची आठवण करून देत कतरिना म्हणाली होती,''Anxiety आहे ठीक आहे,पण याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. साधारण वाटत असला तरी त्यानं होणारा त्रास साधारण नाही''. त्यावेळी कतरिनानं दिपीका पदूकोणचं उदाहरण देताना तिनं कसं आपल्या डिप्रेशनवर मात केलीय याविषयी देखील सांगितलं होतं.
कतरिनानं स्वतःला झालेल्या Anxiety आजाराविषयी म्हटलं आहे की,''मी या आजारावर मात करताना याच्याशी संबंधित अनेक तज्ञांची पुस्तकं वाचली. यातील विचारांवर एकाग्रतेने विचार केला. त्यावेळी मला कळलं की, भावनेच्या आहारी जाऊ नका. आपल्या मनात येणाऱ्या वाईट विचारांचे गुलाम होऊ नका ही मला त्यातून महत्त्वाची गोष्ट कळाली. कारण ते मानसिक विचार आपल्या आत्मविश्वासाला दाबून टाकण्याचा प्रयत्न करतात. बस्स मी फक्त हे समजून घेतलं,आणि तसं वागायला सुरुवात केली. आणि अखेर माझ्या या मानसिक आजारावर मी कंट्रोल मिळवला''.
कतरिना पुढे म्हणाली,''हे विश्व आपण नाही चालवत आहोत. बस्स, हे सगळं एका शक्तीच्या आधाराने सुरू आहे. फक्त आपण यामध्ये घडणाऱ्या चांगल्या गोष्टींवर विश्वास ठेवून त्यांच्या आधारानं आयुष्य जगायला हवं. जी शक्ती या विश्वाला चालवत आहे,ती आपल्या सोबतही असते. आपण मनातल्या त्या नकारात्मक विचारांना झुगारून द्यायचं जे आपल्यासाठी खरंतर कधीच महत्त्वाचे नसतात''.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.