दैवाने दिले; कर्माने नेले! KBC विजेता सुशील कुमारची दुर्दैवी कहाणी

सुशील कुमारची ही कहाणी अनेकांना धडा शिकवणारी आहे.
kbc winner sushil kumar
kbc winner sushil kumar
Updated on

'कौन बनेगा करोडपती'चा KBC तेरावा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या लोकप्रिय शोमध्ये भाग घेऊन आजवर अनेकांनी बक्षिसाची रक्कम जिंकली. मात्र मिळवलेली रक्कम ही प्रत्येकालाच टिकवता येते, असं नाही. 'केबीसी'मध्ये पाच कोटी रुपये जिंकणारा सर्वांत पहिला स्पर्धक सुशील कुमार Sushil Kumar रातोरात प्रसिद्ध झाला. मात्र ही प्रसिद्धी त्याला टिकवता आली नाही. एका फेसबुक पोस्टद्वारे त्याने हे सत्य सर्वांना सांगितलं होतं. २०११ मध्ये सुशील कुमारने पाच कोटी रुपये जिंकले होते. त्याच्या बुद्धीचं सर्वत्र कौतुक होत होतं. सुशील कुमार रातोरात सेलिब्रिटी झाला होता. फक्त बिहारच नाही तर इतर राज्यांमध्येही त्याला प्रमुख पाहुणा म्हणून अनेक कार्यक्रमांमध्ये आमंत्रित केलं जात होतं.

'केबीसी जिंकल्यानंतर माझ्या आयुष्यातील सर्वांत वाईट काळ सुरू झाला'

'२०१५ ते २०१६ हा माझ्या आयुष्यातील सर्वांत कठीण काळ होता आणि नेमकं काय करावं हेच मला सुचत नव्हतं. केबीसी जिंकल्यानंतर मला विविध कार्यक्रमांमध्ये बोलावलं जात होतं. महिन्यातील १५ दिवस असेच जायचे. पत्रकारांना काहीतरी सांगता यावं यासाठी मी काही रक्कम विविध व्यवसायांमध्ये गुंतवले. मात्र त्यातील कोणत्याच व्यवसायातून फायदा झाला नाही. पैसे बुडाल्यानंतर पत्नीसोबतच्या नात्यावरही परिणाम झाला. या सर्व घटनांमुळे मी व्यसनाच्या आहारी गेलो. मला चित्रपटात दिग्दर्शनात रस होता, म्हणून मी मुंबईला आलो. पण मला आधी टेलिव्हिजनवर नशिब आजमावण्यास सांगितलं गेलं. शांत डोक्याने जेव्हा सर्व गोष्टींचा विचार केला, तेव्हा मला जाणवलं की मुंबईला दिग्दर्शक बनण्यासाठी नाही तर स्वत:पासून दूर पळण्यासाठी आलो होतो. प्रसिद्ध व्यक्ती बनण्यापेक्षा चांगला व्यक्ती होण्यावर भर देणं हजार पटींनी बरं आहे,' असं त्याने फेसबुकवर लिहिलं होतं.

kbc winner sushil kumar
अमिताभ बच्चन-सचिन खेडेकर यांची 'ग्रेट भेट'

वास्तवाची जाणीव झाल्यानंतर सुशील पुन्हा गावी परतला आणि शिक्षक होण्याचं ठरवलं. सुशील कुमारची ही कहाणी अनेकांसाठी धडा शिकवणारी ठरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.