Naseeruddin Shah Birthday: जेव्हा नसीरुद्दीन शाह शिवाजी महाराजांची भूमिका साकारतात आणि..

Shivaji Maharaj: नसिरुद्दीन शाह यांनाही शिवाजी महाराज साकारण्याचं सौभाग्य मिळालं
Naseeruddin Shah, Shivaji Maharaj,
Naseeruddin Shah, Shivaji Maharaj, SAKAL
Updated on

Naseeruddin Shah as Shivaji Maharaj: आजवर अनेक मराठी कलाकारांनी शिवाजी महाराजांची भूमिका उत्तम साकारली. शिवाजी महाराज हे असं व्यक्तिमत्व आहे कि ज्यांची भूमिका कोणत्याही कलाकाराने साकारली तरी त्या भूमिकेचं महत्व कमी होत नाही.

शिवाजी महाराज साकारताना कलाकारांच्या अभिनयाचा कस लागतो. भारतीय रंगभूमी आणि सिनेसृष्टीवर गेली अनेक दशकं अधिराज्य गाजवणारे अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनाही शिवाजी महाराज साकारण्याचं सौभाग्य मिळालं.

Naseeruddin Shah, Shivaji Maharaj,
Shiv Jayanti 2023: शिवरायांच्या कार्याचा अभिमान बाळगायचा असेल तर.. किरण मानेंची पोस्ट व्हायरल

'भारत एक खोज' हि मालिका दूरदर्शनवर १९८९ साली सुरु होती. भारतीय संस्कृतीचा सामाजिक, भौगोलिक आढावा या मालिकेतून पाहायला मिळाला. श्याम बेनेगल यांनी हि मालिका दिग्दर्शित केलीय.

या मालिकेत ३७ आणि ३८ भागात शिवाजी महाराज यांच्या जीवनाचा आढावा घेण्यात आला. शिवाजी महाराज, जिजाबाई, दादोजी कोंडदेव अशी ऐतिहासिक व्यक्तिमत्व मालिकेत दिसली. नसिरुद्दीन शाह यांनी शिवाजी महाराजांची भूमिका या भागांमध्ये साकारली.

Naseeruddin Shah, Shivaji Maharaj,
Shiv Jayanti 2024: चंद्रकांत मांढरे ते शरद केळकर.. या कलाकारांनी छत्रपती शिवरायांची भूमिका अजरामर केली

नसिरुद्दीन उत्तम अभिनय करणारे कलाकार आहेत. त्यामुळे त्यांनी शिवाजी महाराजांची भूमिका उत्तम साकारली. महाराजांचा रुबाब, त्यांची नजाकत, दरारा अशा अनेक गोष्टी नसिरुद्दीन शाह यांनी प्रभावीपणे साकारल्या.

या मालिकेत औरंगजेब आणि शिवाजी महाराज यांचा संघर्ष दिसून आला. याशिवाय शिवाजी महाराजांनी केलेला अफजलखान वधाचा प्रसंग मालिकेत दाखवण्यात आलाय.

भारत एक खोज हि ५३ भागांची मालिका होती. या मालिकेत चाणक्य, चंद्रगुप्त पासून शिवाजी महाराज, विवेकानंद, महात्मा गांधींपर्यंत अनेकांच्या कार्याचा आढावा घेतलाय. मालिकेत शिवाजी महाराज यांची भूमिका नसिरुद्दीन शाह यांनी साकारली.

तर ओम पुरी औरंगजेबाच्या भूमिकेत होते. याशिवाय अनंग देसाई, अच्युत पोतदार अशा कलाकारांनी सुद्धा महत्वाच्या भूमिका साकारल्या.

Naseeruddin Shah, Shivaji Maharaj,
Sayli Patil: परश्याची नवीन हिरोईन दिसायला अतिसुंदर सायली..

नसिरुद्दीन यांच्या वर्क फ्रंट बद्दल सांगायचं झालं तर... जानेवारी २०२३ मध्ये नसिरुद्दीन यांनी कुत्ते सिनेमात अभिनय केला. याशिवाय नसिरुद्दीन सम्राट अकबरच्या भूमिकेत ताज या वेबसिरीजमध्ये झळकले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.