..त्या घटनेमुळे शाहरुखला डांबलं होतं तुरुंगात; नाना पाटेकरांमुळे मिळाला जामीन

खुद्द शाहरुखनेच सांगितला किस्सा
shah rukh khan and nana patekar
shah rukh khan and nana patekar
Updated on

बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खान Shah Rukh Khan गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत राहत आहे. पण करिअरच्या सुरुवातीला तो दिल्लीमध्ये राहत होता. एका मुलाखतीत शाहरुखने पत्रकारासोबतचा एक किस्सा सांगितला होता. सहकलाकारासोबत अफेअरची बातमी छापल्याने शाहरुखने संबंधित पत्रकाराला धमकी दिली होती. यामुळे त्याला तुरुंगातही जावं लागलं होतं. या प्रसंगात अभिनेते नाना पाटेकर Nana Patekar यांनी शाहरुखची मदत केली होती.

'तहलका'च्या 'थिंक २०१२' या कार्यक्रमात शाहरुखने हा किस्सा सांगितला होता. १९९३ साली 'कभी हा कभी ना' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शाहरुखच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावेळी गौरीशी लग्न करून फक्त दोन वर्षे झाली होती. अफेअरच्या चर्चांमुळे फिल्म स्टारशी लग्न करून चूक केली का, असा प्रश्न त्यावेळी गौरीला पडल्याचं शाहरुखने मुलाखतीत सांगितलं. अफेअरच्या चर्चांमुळे भडकलेला शाहरुख संबंधित पत्रकाराच्या घरी पोहोचला होता. "मी त्यावेळी खूप वाईट पद्धतीने वागलो होतो. त्यासाठी मला तुरुंगातही जावं लागलं होतं. पंजाबी लग्नपद्धतीनुसार माझ्या सासऱ्यांनी मला लग्नात कुकरीसारखा चाकू दिला होता. ते घेऊन मी त्या पत्रकाराच्या घरी गेलो होतो. संबंधित पत्रकाराला धमकी देऊन मी नंतर शूटिंगच्या सेटवर पोहोचलो होतो. घटनेच्या काही दिवसांनंतर पोलीस मला अटक करण्यासाठी आले होते."

shah rukh khan and nana patekar
गौरी खानच्या हातात 'ब्लॅक वॉटर'; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
shah rukh khan and nana patekar
BBM 3: दादूसच्या पत्नीची चिंता; बीपी-शुगर असतानाही पूर्ण केला टास्क

तुरुंगात असताना शाहरुखला एक फोन कॉल करण्याची परवानगी पोलिसांकडून देण्यात आली होती. त्यावेळी शाहरुखने रागाच्या भरात त्याच पत्रकाराला फोन केला होता. पत्रकाराला फोन करून शाहरुखने पुन्हा त्याला धमकी दिली होती. मात्र या संपूर्ण घटनेमुळे गौरीला मानसिक त्रास सहन करावा लागल्याने शाहरुखने नंतर काही केलं नाही. त्यावेळी अभिनेते नाना पाटेकर यांनी त्याला तुरुंगातून बाहेर काढण्यात मदत केल्याचं शाहरुखने सांगितलं. शाहरुख आणि नाना यांनी 'राजू बन गया जेंटलमन' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. अजिज मिर्झा दिग्दर्शित हा चित्रपट १९९२ साली प्रदर्शित झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.