Urfi Javed News: अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद तिच्या अंतरंगी आणि अजब फॅशन सेन्समुळे नेटकऱ्यांमध्ये कायम चर्चेचा विषय असते. उर्फी आणि तिचे कपडे हे एक अजब समीकरण आहे.
नेटकरी तिला प्रचंड ट्रोल करत असतात. आता उर्फीच्या एका वक्तव्यावरून आता नव्या चर्चेला उधाण आलंय. एका यु ट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत उर्फीने हा अजब सवाल उपस्थित केलाय.
(Who decided that my name is Muslim? Urfi's strange question to the netizens)
प्रकरण नेमकं काय?
काही दिवसांपूर्वी अभिनेता फैजान अन्सारीने जुहू स्मशानभूमीत अर्ज केला आहे. त्याने उर्फी जावेद विरोधात फतवा काढण्यात यावा, असं त्याने आपल्या निवेदनात म्हटले. मुस्लिम मुलगी विवस्त्र फिरते असे कोणी म्हटल्यावर खूप लाज वाटते.
उर्फीने इस्लाम धर्माचा अपमान केला आहे. ती मेल्यावर तिला स्मशानात जागाही दिली जाणार नाही. असा फतवा फैझानने काढला
इतकंच नव्हते तर उर्फी जावेद ज्या प्रकारचे कपडे घालते ते जगभरात मुस्लिमांची बदनामी करत आहेत. जर ती म्हणाली की ती इस्लामवर विश्वास ठेवत नाही, तर सर्वप्रथम तिचे नाव बदला.
मुस्लिम मुलगी असे कपडे घालते असे कोणी म्हटल्यावर आपल्याला खूप वाईट वाटते. त्यामुळेच त्यांनी दिल्लीचे मौलाना आणि मुंबईचे शहर काझी यांच्याकडे उर्फीची तक्रार केली.
उर्फी काय म्हणते?
Instantbollywood या यु ट्यूब चॅनलने याबद्दल उर्फीला बोलतं केलं. तेव्हा उर्फी म्हणाली, "हा कोण आहे माणूस. त्याला काही कामधंदे नाहीत का? हा कोण आहे हे निर्णय घेणारा.
आणि उर्फी नाव मुस्लिम आहे हे ठरवणारा हा कोण?" अशा शब्दात उर्फीने तिचं परखड मत मांडलं आहे. उर्फीने केलेले वक्तव्य सध्या चर्चेचा विषय आहे.
उर्फीचा एक नवीन फॅशन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. उर्फीनं यावेळी आपलं अंग झाकण्यासाठी ना कपड्याचा वापर केला आहे ना हातांचा.
चक्क उर्फीनं यावेळी बांबूच्या टोपल्या घेऊन त्यापासून आपला ड्रेस बनवला आहे.
उर्फीच्या या विचित्र प्रयोगानं सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलेच आहेत पण हिच्या डोक्यात या कल्पना येतात कुठून या विचारानं लोकांन हैराण करून सोडलं आहे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.