Who is Baba Siddique : सलमान-शाहरुखची भांडणेसुद्धा मिटवली, का फेमस आहे बाबा सिद्धिकींची 'इफ्तार पार्टी'?

Why is Baba Siddiqui's 'Iftar Party' famous? कॉग्रेसचे आमदार बाबा सिद्धिकी यांनी अखेर कॉग्रेसला सोडचिठ्ठी देत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटात जाण्याचे सांगताच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
 Who is Baba Siddique
Who is Baba Siddique esakal
Updated on

Who is Baba Siddique : कॉग्रेसचे आमदार बाबा सिद्धिकी यांनी अखेर कॉग्रेसला सोडचिठ्ठी देत अजित पवार यांच्या गटात जाण्याचे सांगताच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आपल्या वेगळ्या अंदाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या बाबा सिद्धिकी यांच्या नावाची बॉलीवूडमध्ये मोठी क्रेझ असल्याचे दिसून आले आहे. खासकरुन सलमान अन् शाहरुखची त्या कारणावरुन झालेली भांडणं सोडवून त्यांनी लक्ष वेधून घेतले होते.

कोण आहेत बाबा सिद्धिकी?

राजकीय क्षेत्राबरोबरच मनोरंजन क्षेत्रात देखील बाबा सिद्धिकी हे मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. त्यांनी तरुण वयात १९७७ मध्ये कॉग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ते नॅशनल स्टुंडड युनियन ऑफ इंडिया च्या स्टुडंड विंगमध्ये सहभागी झाले होते. बाबा सिद्धिकी यांनी मुंबईतील एमएमके महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते तीन वेळा कॉग्रेस पक्षाचे आमदारही राहिले आहेत.

मुंबईमध्ये बाबा सिद्धिकी यांची लोकप्रियता मोठी आहे. खासकरुन बॉलीवूडमध्ये त्यांचा असणारा संपर्कही मोठा आहे. आपल्या मतदार संघातील लोकांच्या मदतीला धावून जाणे आणि त्यांना सहकार्य करणे यासाठी बाबा ओळखले जातात.

सारं बॉलीवूड बाबा सिद्धिकींच्या इफ्तार पार्टीत...

बाबा सिद्धिकी (Baba Siddique latest News) यांच्या इफ्तार पार्टीत बॉलीवूडमधील वेगवेगळे सेलिब्रेटी सहभागी होत असल्याचे दिसून आले आहे. यात सलमान खान, सोहेल खान, अरबाज खान, अंकिता लोखंडे, शहनाज गिल, शिल्पा शेट्टी, आयुष शर्मा, अर्पिता खान, सना खान, जय भानुशाली, रश्मि देसाई,करण सिंग ग्रोव्हर, कृष्णा अभिषेक,संजय दत्त,हिना खान, यांच्या नावाचा समावेश आहे.

 Who is Baba Siddique
Baba Siddiqui Resign: 'मला खूप काही बोलायचं आहे पण...',बाबा सिद्दीकी यांचा ४८ वर्षांनी अखेर काँग्रेसला जय महाराष्ट्र! कोणत्या पक्षात जाणार?

सुनील दत्त यांना आदर्श मानतात बाबा सिद्धिकी...

मीडियातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकारणात येण्यापूर्वी बाबा सिद्धिकी हे वडील अब्दुल रहीम सिद्धिकी यांनी त्यांच्या कामात मदत करायचे. त्यानंतर बाबा सिद्धिकी यांनी स्वताची वेगळी ओळख निर्माण केली आणि ते मुंबई युवा कॉग्रेसचे महासचिव झाले. त्यानंतर ते अभिनेता सुनील दत्त यांच्या संपर्कात आले. इथुनच त्यांच्या इफ्तार पार्टीला सुरुवात झाली असे सांगण्यात येते.

बाबा सिद्धिकी हे सुनील दत्त यांना आपला आदर्श मानतात. त्यांच्यापासून प्रेरणा घेत त्यांनी इफ्तार पार्टीची सुरुवात केली. या पार्टीची लोकप्रियता तेव्हा वाढली जेव्हा शाहरुख अन् सलमानची भांडणं बाबांनी सोडवली होती. गेल्या काही वर्षांपासून शाहरुख अन् सलमानमध्ये अबोला होता. तो बाबांनी त्यांच्या इफ्तार पार्टीमध्ये सोडवली होती. कतरिनाच्या बर्थ डे पार्टीमध्ये ती भांडणं झाली होती.

शाहरुख अन् सलमानचं झालं होतं जोरदार भांडण!

बॉलीवूडचे दोन स्टार्स हे एकमेकांना भिडले होते. त्याच कारण होतं अभिनेत्री कतरिना कैफ. किंग खान शाहरुखनं कतरिनावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यावरुन रागाला गेलेल्या सलमाननं शाहरुखवर आगपाखड केली होती. ती भांडणं खूपच टोकाला गेली. त्यामुळे दोन्ही अभिनेत्यांमध्ये बरेच दिवस अबोलाही होती. त्याचे पडसाद बॉलीवूडमध्ये उमटल्याचे दिसून आले.

त्या भांडणामध्ये शाहरुखची पत्नी गौरी खान देखील सहभागी होती. या प्रकरणानंतर सलमान-शाहरुख हे एकमेकांना टाळू लागले होते. २०१३ मधील हे प्रकरण अखेर आमदार बाबा सिद्धिकी यांच्या इफ्तार पार्टीमध्ये मिटले. सलमान अन् शाहरुख यांनी एकमेकांची गळाभेट घेतल्याचे फोटो तेव्हा व्हायरल झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.