Kantara: कांतारा सिनेमाचा मुख्य अभिनेता ऋषभ शेट्टी सध्या भलताच चर्चेत आहे. आणि चर्चा तर व्हायलाच हवी कारण ऋषभ शेट्टीचा 'कांतारा' सध्या बॉक्सऑफिसवर सुसाट कमाई करत सुटला आहे. लिमिटेड स्क्रीन्सवर सिनेमा रिलीज होऊनही कांतारानं प्रेक्षकांवर मोठ्या प्रमाणात जादू केली आहे. ऋषभ शेट्टीची 'कांतारा' सिनेमातील दमदार व्यक्तीरेखा लोकांना भलतीच आवडलेली आहे.(Who is Kantara Star Rishabh Shetty? Know Struggle have sold bottles)
ऋषभ शेट्टीला पाहून लोक खूश होतायत खरं, पण हा ऋषभ शेट्टी नेमका आहे कोण? चला,आम्ही तुम्हाला अभिनेत्याविषयी काही इंट्रेस्टिंग गोष्टी सांगतो. 'कांतारा' सिनेमात आपल्या अभिनयाची दमदार झलक दाखवणारा ऋषभ शेट्टी सध्या पॅन इंडिया स्टार बनला आहे. त्याने आपल्या अभिनयानं लोकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. पण खूप कमी लोकांना माहीत आहे की ऋषभ शेट्टीनं 'कांतारा' सिनेमात अभिनय करण्या व्यतिरिक्त सिनेमाच्या कथेला लिहिलं देखील आहे आणि सिनेमाला दिग्दर्शित देखील केलं आहे.
ऋषभ शेट्टी आज साऊथ सिनेमाचा बडा स्टार बनला आहे,पण त्याच्यासाठी हा प्रवास काही सोपा नव्हता. त्याने याठिकाणी पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. ऋषभ शेट्टीनं तब्बल १८ वर्ष स्ट्रगल केलं तेव्हा कुठे तो आज जिथं पोहोचला आहे तिथं पोहोचणं त्याला शक्य झालं आहे.
ऋषभ शेट्टीचं स्वप्न नेहमीच अभिनेता बनण्याचं होतं. त्याने कॉलेज पूर्ण झाल्यावर अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला. आपल्या करिअरची सुरुवात त्यानं थिएटरपासून केली. त्यानंतर त्यानं मालिकांमध्ये काम केलं. प्रेक्षकांचा तिथेही त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच्या अभिनयाला आणि त्यातील हटके अंदाजाला लोक पसंत करू लागले. चाहत्यांच्या या प्रेमानेच ऋषभ शेट्टीचं स्वप्न पूर्ण करायला मदत केली आणि मग त्यानं ठरवलं की तो देखील एक मोठा अभिनेता बनू शकतो.
पण एका सर्वसामान्य मुलाला सुपरस्टार बनणं तितकं सोप्प मुळीच नसतं. ऋषभ शेट्टीनं कॉलेजच्या दिवसांतच छोटी-मोठी कामं करायला सुरुवात केली होती. रिपोर्ट्सनुसार कळत आहे की, ऋषभ शेट्टीनं अभिनेता बनण्याआधी पाण्याच्या बॉट्ल्स विकायला सुरुवात केली होती. त्याने हॉटेलमध्ये देखील काम केलं आहे. आणि ही कामं करता करता तो अभिनयात देखील आपलं नशीब आजमावत होता.
असं म्हणतात तुमचं ध्येय तुम्हाला कधीच शांत बसू देत नाही. तुम्ही ध्येयाने झपाटलेले असाल तर कधीच हार मानत नाही,प्रयत्न करता. आणि म्हणूनच ऋषभ शेट्टीची मेहनत आणि प्रयत्न त्याला यशस्वी बनवून गेले. ऋषभ शेट्टीने २००४ मध्ये आपला पहिला सिनेमा Nam Areal Ondina केला. पहिल्या सिनेमात त्याची भूमिका खास काही नव्हती,फारच छोटी होती पण त्यानं आपल्या अभिनयानं त्या भूमिकेतही रंग भरून ती लक्षवेधी बनवली. त्याने अनेक वर्ष छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या. पण हवी तशी ओळख त्याला इंडस्ट्रीत मिळत नव्हती,ज्याचं स्वप्न उराशी बाळगून तो अभिनय क्षेत्रात आला होता. अशा पद्धतीनं एक सुपरस्टार होण्यासाठी ऋषभ शेट्टीनं तब्बल १८ वर्ष स्ट्रगल केलं.
ऋषभ शेट्टीनं अनेक सिनेमांसाठी सहाय्यक दिग्दर्श म्हणूनही काम केलं, एवढं सगळं स्ट्रगल केल्यानंतर ऋषभ शेट्टीला २०१९ मध्ये मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. ऋषभ शेट्टीनं 'बेल बॉटम' या सिनेमात पहिली-वहिली कारकिर्दीतील मुख्य भूमिका साकारली. त्यानं अनेक सिनेमे केले पण हवं तसं नाव त्याचं होत नव्हतं. पण त्यानं हार मानली नाही,तो प्रयत्न करत राहिला.
त्यानंतर ऋषभ शेट्टीनं 'कांतारा' लिहिला आणि आपण स्वतः लिहिलेल्या सिनेमात त्याने मुख्य भूमिका साकारली. हा सिनेमा त्यानं दिग्दर्शितही केला आणि याला मिळालेलं यश आपण सगळेच पाहात आहोत. सिनेमानं बॉक्सऑफिसवर धूमाकुळ घातला आहे. भले-भले सिनेमे त्याच्यासमोर नांगी टाकत आहेत. सिनेमानं कमाई करताना अनेक रेकॉर्ड्सही तोडले आहेत. आणि असं 'कांतारा' सिनेमानं ऋषभ शेट्टीरा सुपरस्टार बनवलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.