Nikita Gandhi: जिच्या कॉन्सर्टमध्ये लोकांनी जीव गमावला अशी निकीता गांधी आहे तरी कोण?

निकीता गांधीच्या कॉन्सर्टसाठी जमलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा जीव गमवावा लागला
 Who is Nikita Gandhi in whose concert people lost their lives in kochi keral
Who is Nikita Gandhi in whose concert people lost their lives in kochi keralSAKAL
Updated on

Who is Nikita Gandhi: केरळमधील कोचीन येथे झालेल्या चेंगराचेंगरीत चार विद्यार्थ्यांना त्यांचा जीव गमवावा लागला. कॅम्पसमधील ओपन एअर ऑडिटोरियममध्ये झालेल्या कार्यक्रमात सायंकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडली.

यात कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर ४६ विद्यार्थी जखमी झाले निकीता गांधीच्या लाईव्ह कॉन्सर्टसाठी हे विद्यार्थी एकत्र जमले होते. जिच्या कार्यक्रमासाठी एवढी गर्दी होऊन ही घटना घडली ती निकीता गांधी आहे तरी कोण?

 Who is Nikita Gandhi in whose concert people lost their lives in kochi keral
Prajakta Mali: महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरींच्या आयुष्यात... प्राजक्ता माळीची खास पोस्ट चर्चेत

कोण आहे निकीता गांधी?

32 वर्षीय निकिता गांधी ही एक भारतीय पार्श्वगायिका आहे. निकिताचा जन्म 2 ऑक्टोबर 1991 रोजी कोलकाता, पश्चिम बंगाल येथे एका बंगाली - पंजाबी कुटुंबात झाला.

तिने हिंदी, तामिळ, तेलगू, बंगाली आणि कन्नड अशा पाच वेगवेगळ्या भाषांमधील भारतीय चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'राबता' चित्रपटातील 'राबता' या शीर्षकगीतासाठी तिने खास गाणे गायले आहे.

डिग्रीचं शिक्षण घेत असताना ती चेन्नईमध्ये राहात होती. तिने सुमारे 12 वर्षे ओडिसी नृत्य आणि हिंदुस्थानी संगीत शिकले.

'जग्गा जासूस' चित्रपटात निकीताने अरिजित सिंगसोबत 'उल्लू का पट्टा' हे गाणे गायले होते जे खूप गाजले. याशिवाय निकिता गांधीने 'सचिन: अ बिलियन ड्रीम्स', 'जब हॅरी मेट सेजल', 'केदारनाथ', 'लुका छुपी', 'सूर्यवंशी' आणि 'टायगर 3' अशा अनेक हिंदी चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत.

याशिवाय 'लियो', 'वारीसु', 'कॉकपिट' आणि 'किश्मिश' यांसारख्या चित्रपटांसाठी बंगाली आणि तमिळ गाणीही गायली आहेत. तिने गायलेली 'आओ कभी हवेली पे' आणि 'पोस्टर लगवा दो' ही गाणी लोकांच्या प्लेलिस्टमध्ये आहेत. बादशाहसोबत तिने गायलेले 'जुगनू' हे गाणे सुपरहिट ठरले आहे.

संध्याकाळी कोची येथे घडलेल्या घटनेमुळे मी उद्धवस्त झाले आहे. मी कॉन्सर्टला लाईव्ह परफॉर्मन्स करण्यासाठी पोहचायच्या आधीच ही घटना घडली. या दुर्देवी घटनेवर दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. विद्यार्था आणि त्यांच्या कुटूंबियांसाठी मी प्रार्थना करेल.

अशा शब्दात निकीता गांधीने तिचं दुःख व्यक्त केलंय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.